Cricketer Yashasvi Jaiswal Buys Rs 5.4 Crore Home In Mumbai Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yashasvi Jaiswal House in Mumbai : यशस्वी जयस्वाल ज्यावेळी मुंबईत (mumbai) आला त्यावेळी त्याच्याकडे राहायलाही घर (Yashasvi Jaiswal House) नव्हतं. तंबूतमध्ये तो राहायचा, पाणीपुरीही विकली.. कठीण परिस्थितीवर मात करत यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal House) यानं यशाचं शिखर गाठलं. आता यशस्वी जयस्वाल यानं मुंबईत 5 कोटी 34 लाख रुपयांचं अलिशान घर खरेदी केलेय. तंबूत सुरु झालेला यशस्वीचा प्रवास आता टॉवरपर्यंत जाऊन पोहोचलाय. 

यशस्वी जयस्वाल सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्यानं नुकतीच इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं लागोपाठ दोन सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. यशस्वीच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. यशस्वीच्या आयसीसी क्रमवारीतही मोठा बदल झालाय. अवघ्या सात सामन्यात त्यानं आघाडीच्या 15 खेळाडूंमध्ये स्थान पटकावलं आहे.  यशस्वी जयस्वालची एकामागून एक स्वप्न पूर्ण होतं आहे. अतिशय कठीण परिस्थित सुरु केलेला त्याचा प्रवास यशापर्यंत पोहचलाय. यशस्वी जायस्वाल याचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालेय. यशस्वी जयस्वाल यानं मुंबईत कोट्यवधी रुपयांचं घर घेतलेय. 

तंबूतला प्रवास टॉवरपर्यंत पोहचलाय – 

यशस्वी जयस्वाल ज्यावेळी मुंबईत आला, त्यावेळी त्याच्याकडे राहायला घर नव्हतं. खिशात पैसाही नाही.  मुंबईसारख्या शहरात राहायचं कुठं? असा प्रश्न सतावत होता. यशस्वी जयस्वाल सुरुवातीला एका दुधाच्या डेअरीमध्ये राहिला. त्यानंतर मैदानात काम करणाऱ्या माळी काकांबरोबर तंबूत राहिला होता. पण अथक परीश्रमाच्या जोरावर यशस्वीने आपले स्थान निर्माण केले. क्रिकेटमध्ये यशाची चव चाखल्यानंतर त्यानं आता मुंबईत स्वप्नातील घर घेतलं आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार,वांद्र्यातील उच्चभ्रु परिसरात यशस्वी जयस्वाल यानं 5 कोटी 34लाख रुपयांच्या किंमतीमध्ये घर खरेदी केलेय. हे अलिशान घर 1110 स्क्वेअर फूट इतकं प्रशस्त आहे. 7 जानेवारी 2024 रोजी घराचं रजिस्ट्रेशन झालेय. इतर प्रक्रिया सुरु आहे. लवकरच तो नव्या घरात राहायला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, यशस्वी जयस्वालचं हे नवं घरं वांद्रे-कुर्ला संकुलाजवळ (बीकेसी) आहे.  या घराच्या प्रति स्क्वे. फूटासाठी यशस्वी जैस्वालने तब्बल 48000 रुपये मोजले आहेत. या वर्षीच्या अखेरीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे संकेत दिले जात आहेत.

आणखी वाचा :

और ये लगा सिक्स…! ‘हा’ खेळतो की मस्करी करतो? एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स; BCCI कडून VIDEO शेअर



[ad_2]

Related posts