Who Is Akash Deep Can Debut For India In Ranchi 4th Test Team India Vs England Jasprit Bumrah Mukesh Kumar Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India vs England 4th Test Match: रांची : टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात  सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना (4th Test Match) 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियानं सध्या मालिकेत 2-1 नं आघाडी घेतली आहे. तसेच, बीसीसीआयच्या (BCCI) वतीनं इंग्लंड विरोधातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी संघात महत्त्वाचे बदल केले आहेत.

टीम इंडियाचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी मुकेश कुमारला (Mukesh Kumar) संधी दिली आहे. तर, केएल राहुल (KL Rahul) चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे, त्यामुळे आता प्रश्न पडतो की, बुमराहच्या जागी कोण खेळणार? 

आकाश दीप घेऊ शकतो बुमराहची जागा 

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कोण खेळणार? हा प्रश्न सध्या बीसीसीआयसमोर आहे. पण कदाचित बीसीसीआयला या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे आणि ते उत्तर म्हणजे, आकाश दीप. मूळचा बिहारचा असलेला वेगवान गोलंदाज आकाश दीप चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतो. अलीकडेच त्यानं इंग्लंड लायन्सविरुद्ध आपल्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. आकाशनं इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 2 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या होत्या. चौथ्या कसोटीत आकाश दीप टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. 

इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत युवा खेळाडूंचं पदार्पण 

याआधी रजत पाटीदारनं दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं, तर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं. आता आकाश दीपही चौथ्या कसोटीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

आकाश दीपची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कारकीर्द

27 वर्षीय आकाश दीपनं त्याच्या प्रथम श्रेणी करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 104 विकेट्स आहेत. त्याची सरासरी 23.58 आहे. एवढंच नाही तर आकाश दीप आयपीएलही खेळला आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.

बुमराह-राहुल OUT, मुकेश IN

बीसीसीआयनं एका निवेदनात म्हटलं आहे की, “जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्ध रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी संघातून विश्रांती देण्यात आली आहे. मालिकेचा कालावधी आणि अलीकडच्या काळात त्यानं खेळलेलं क्रिकेट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, केएल राहुल चौथ्या कसोटीतूनही बाहेर आहे. धरमशाला येथे होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यात त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून आहे. राजकोटमधील तिसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर असलेला मुकेश कुमार रांचीमध्ये संघात दाखल झाला आहे.”

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

और ये लगा सिक्स…! ‘हा’ खेळतो की मस्करी करतो? एका ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स; BCCI कडून VIDEO शेअर

[ad_2]

Related posts