HSC Exam Copy In Marathwada 40 copy cases in Marathwada Beed Copy Case at Exam Center in Beed Parbhani Chhatrapati Sambhaji Nagar Jalna Nanded Latur District marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस (HSC Exam) बुधवारपासून (21 फेब्रुवारी) सुरुवात झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाच फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारण मराठवाड्यातील (Marathwada) अनेक पपरीक्षा केंद्रावर कॉपी (Copy) करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मराठवाड्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर एकूण 40 कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे परभणीच्या एकाच केंद्रावर तब्बल 20 कॉपीचे प्रकरणे समोर आली आहे.   

मराठवाड्यातील 690 केंद्रांवर 2 लाख 75 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या 5 जिल्ह्यामध्ये 26 कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. तर, लातूर विभागात लातूर, धाराशीव, नांदेड जिल्ह्याचा समावेश असून या ठिकाणी एकूण 14  कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. 

एकाच केंद्रावर 20 कॉपीचे प्रकरणे

परभणी जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर एकूण 21 कॉपी प्रकरणे समोर आले. विशेष म्हणजे यातील 20 कॉपी प्रकरणे हे गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील बालाजी ज्युनिअर कॉलेज या परीक्षा केंद्रावरील होते. सोनपेठ तालुक्यातील संत पाचलेगावकर कनिष्ठ महाविद्यालय कोथळा येथे एक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. तर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत बहिणाबाई कनिष्ठ महाविद्यालयात सुद्धा एकाचवेळी 4 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

इमारतीवर चढून कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल…

परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परीक्षा केद्रांच्या बिल्डिंगवर चढून कॉप्या पुरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बीड जिल्ह्यात हा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. बीडच्या तेलगावामध्ये असलेल्या सरस्वती महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थी परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने कॉपीमुक्त अभियानाचा कसा फज्जा उडाला हे यातून दिसून येत आहे. 

नांदेडमध्ये परीक्षा केंद्रात ड्रोन कॅमेराचा वापर 

बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी नांदेड जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाने ड्रोन कॅमेराचा वापर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी देऊन या अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा केली. नायगाव तालुक्यातील जनता हायस्कूल, कंधार तालुक्यातील नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल या केंद्रावर ड्रोनने परिसराची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आला होता. तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांसोबतच इतरांवरही कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या : 

HSC Exam Copy : बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट! बीडच्या सरस्वती विद्यालयाच्या इमारतीवर चढून पुरवल्या कॉप्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts