Chhatrapati Sambhaji Nagar Crime Garudzep Academy Two student suicide in Chhatrapati Sambhaji Nagar police raid to Garudzep Academy marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज भागात असलेल्या गरुडझेप अकॅडमीत (Garud Zep Academy) एका तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली होती. अकॅडमीच्या संचालकाच्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता. आता याच अकॅडमीच्या आणखी एक मुलाने आत्महत्या केल्याप्रकरणी अकॅडमीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली आहे. विशेष म्हणजे आता या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 

गरुडझेप अकॅडमीच्या संचालकावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत या अकॅडमीवर छापेमारी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. कारण, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येणाऱ्या मुला-मुलींना या अकॅडमीच्या वसतिगृहात अक्षरशः कोंडवाड्यात जनावरांना कोंबल्यासारखी राहावे लागत असल्याचे समोर येत आहे. अवघ्या दहा बाय सहा फूट आकाराच्या खोलीमध्ये 6 ते 8 मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर वसतिगृहातील एका खोलीत 22 मुले राहत असल्याचे देखील समोर आले आहेत. सरकारी नोकरीच्या अपेक्षेने ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांची या अकॅडमीत वाईट अवस्था असल्याचे समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील उपयुक्त नितीन बगाटे स्वतः या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून असून, पोलिसांच्या तपासात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. 

एकामागून एक दोन आत्महत्या…

शहरातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीने 20 फेब्रुवारी रोजी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी देखील या अकॅडमीच्या आणखी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर येत आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी श्रीकांत वाघ (वय 18 वर्षे, रा. निपाणी आडगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) या युवकाने अकॅडमीत गळफास घेतला होता. मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर झाल्याने व्यवस्थापक राठोड हा त्याला चहा- नाश्ता, जेवायलाही देत नव्हता. याबाबत त्याने संचालक नीलेश सोनवणेकडे तक्रार केली होती. त्यावेळी सोनवणे याने माझे कोणी वाकडे करू शकत नाही. तुला नोकरी लागली नाही तर समाजात तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे म्हणून दररोज शारीरिक व मानसिक त्रास देत होता. याबाबत श्रीकांतने त्याच्या आईला फोन करून सांगितले होते. त्यानंतर श्रीकांतने आत्महत्या केल्याची तक्रार वडील दशरथ वाघ यांनी गुरुवारी पोलिसांत दिली. यावरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संचालक नीलेश सोनवणे, सुरेश सोनवणे, विजय राठोड, शुभम घुगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन; पोलिसांत गुन्हा दाखल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts