Devendra Fadanvis on lok sabha elction 2024 ABP Network Ideas Of India Live Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devendra Fadanvis ABP Network Ideas Of India Live : देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारण सक्रीय होणार आहेत, या चर्चा सुरु होत्या, त्याला आता पूर्णविराम लागला आहे. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच शब्दात उत्तर दिलं. मी दिल्लीमध्ये जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  ते एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात बोलत होते.

लोकसभा लढवून केंद्रात जाणार का??

दिल्लीच्या वातावरणाचा अनुभव घेऊन मी परत मुंबईत येतो. आम्ही दिल्लीमध्ये राहत नाही. कारण दिल्लीपेक्षा मुंबईचे वातवरण चांगलं आहे. राज्यात जे वातावरण गरम वाटतंय, त्याचे कारण जनेतेने दिलेले आहे. बहुमत नाकारले गेले आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मागच्यापेक्षा चांगली कामगिरी यावेळी आमची राहील. अजून खूप काही बाकी आहे मी आधीच बोललोय आगे आगे देखो होता है क्या? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काँग्रेसमधील नेते भाजपात का येत आहेत ?

देशात आज जी परिस्थिती काँग्रेसची आहे त्यावरून त्यांच्या नेत्यांना भविष्य दिसत नाही. आज नवीन भारताचा अनुभव लोक घेत आहेत. त्यामुळे आमच्यासोबत लोक येतात, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

 आगामी लोकसभेत महायुती किती जागा जिंकणार ?

देवेंद्र फडणवीसांना आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला किती जागा मिळणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानं नाहीत, असे मी कधीच म्हणणार नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. आता आम्हाला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल. आम्ही गेलो तर यापेक्षा पुढेच जाऊ, पण आम्ही गेल्या दोनवेळच्या जागांपेक्षा खाली येणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.

उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला कसे तयार झाले?

त्यावेळी मी केंद्रीय नेत्यांना एक गोष्ट सांगितली होती की, मी सत्तेबाहेर राहू इच्छितो. मला माझी प्रतिमा अशी होऊन द्यायची नव्हती की, काल मी मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री झालो तर लोक मला सत्तेसाठी हपापलेला नेता म्हणू शकतात, अशी शंका माझ्या मनात होती. केंद्रीय नेत्यांनी माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे ठरले तेव्हा केंद्रीय नेत्यांनी पुन्हा माझ्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, सरकार चालवायचं असेल तर ते बाहेरुन चालवता येत नाही. तुम्ही समांतर संवैधानिक व्यवस्था म्हणून काम करु शकत नाही. नाहीतर युपीए सरकारप्रमाणे आपली अवस्था होईल. त्यामुळे एक नेता म्हणून तुमच्या मनात शंका असेल, तरीही एक कार्यकर्ता म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा. कारण तुम्ही आतमध्ये असाल तरच हे सरकार व्यवस्थित चालेल. त्यामुळे मी पक्षादेश मानून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यावेळी लोक काय म्हणतील, हा प्रश्न माझ्या मनात कायम होता. पण मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देशभरातून जो प्रतिसाद मिळाला तेव्हा माझ्या मनातील शंका दूर झाली. आज मी विचार करतो तेव्हा मला वाटते की, मी आतमध्ये असल्यामुळेच सरकार चालवणे सोपे आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts