DMER Department DMER Department Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

DMER Department : DMER विभागाचं नक्की काय चाललंय ?  बातमी वैद्यकीय शिक्षण आणि संसोधन विभागात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची. सहा महिन्यांपूर्वी डीएमईआर अंतर्गत तब्बल 48 कॅडर करिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 47 कॅडर च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे सुरू आहे. परंतु लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट यांची पात्र अपात्र यादी सुद्धा गेली चार महिन्यापासून लावण्यात आली नव्हती. परंतु एबीपी माझावर बातमी झळकताच 19 फेब्रुवारी रोजी पात्र अपात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली. त्यामध्ये 287 पैकी 200 उमेदवारांना पात्र करून 87 उमेदवारांना अपात्र करण्यात आलं. त्यासाठी अतिशय किरकोळ आणि फुटकळ कारण या उमेदवारांना देण्यात आलं आहे. पॅरामेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वेळेत दाखल न केल्याचं कारण पात्र उमेदवारांना सांगण्यात आलं आहे. पॅरामेडिकल कौन्सिल चे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी द्या अशी मागणी हे उमेदवार करत आहेत. मुळात, काही महिन्यांपूर्वीच या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. तेव्हाच रजिस्ट्रेशन सर्टिफिकीट का मागितलं नाही, असा सवालही पात्र उमेदवार करत आहेत. दुसरं म्हणजे डीएचएस अंतर्गत जी भरती होतेय, त्यात सर्टिफिकीट सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, मग dmer का देऊ शकत नाही असा सवालही विचारला जातोय

[ad_2]

Related posts