Nationalist Congress Party Sharadchandra Pawar Party Logo tutari Unveiling at Raigad Supriya Sule Lok Sabha Election Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस  (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे.  तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.  या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर रायगडवार गेले आहेत.  

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह बहाल करण्यात आले आहे.  आज रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडला. ‘तुतारी’ चिन्हांचं लॉन्चिंग  या वेळी करण्यात आले.  केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे.

तुतारी वाजवणारा माणूस  चिन्ह राष्ट्रवादी बहाल

दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात  आले  आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर  पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे .  

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

 केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. 

तात्पुरतं मिळालेलं नाव आणि चिन्हही कायम राहण्याची शक्यता

 शरद पवारांना (Sharad Pawar) मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे (Adv. Siddharth Shinde) यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts