pune girls drugs matter actor director ramesh pardeshi shared a disturbing video on social media

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुणे पोलिसांनी एकीकडे देशातील सगळ्यात (Pune Drugs) मोठ्या ड्रग्स रॅकेटचा खुलासा केला आहे तर दुसरीकडे महाविद्यालयीत विद्यार्थी या ड्रग्सच्या नशेत तुल्ल दिसत आहे.  शिक्षणाचं माहेर घर  असलेल्या पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच  पुण्यातील तरुणींना ड्रग्स घेतलेला भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवरचा हा व्हिडीओ आहे. अभिनेते रमेश परदेसी (Ramesh Pardesi) यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन महाविद्यालयीन तरुणी नशेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन तरुणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स प्राषण केल्याने नशेत बडबडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत रमेश परदेसी म्हणातात की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी 4 हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे. 

पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? 

याच व्हिडीओत बोलताना ते म्हणतात की,  शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर.

पुणेकर ड्रग्सवर शांत का?

या व्हिडीओत बोलताना त्यांनी पालकांवरदेखील काही प्रमाणात आरोप केले आहे. शिवाय हे प्रकरणं गांभीर्यानं घेण्याचं आवाहनही त्यांनी पालकांना केलं आहे. आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही. पुण्यात 4 हजार कोटी ड्रग्ज सापडलं पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. मागे ललीत पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : महाविकास आघाडीचा पुण्यात कार्यकर्ता मेळावा; महत्वाचे नेते उपस्थित, लोकसभेसाठीची रणनिती ठरणार?

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts