Dilip Walse Patil sharad pawar Zindabad Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर ‘शरद पवार’ झिंदाबादच्या घोषणा मंत्री दिलीप वळसे पाटलांना आज शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी थेट घाटातचं घेरलं. वळसे बैलगाडा शर्यतीचं घाट गाजवायला गेले पण त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा जयघोषाने घाट दणाणून सोडले. परिणामी वळसेंची बोलती बंद झाली अन त्यांची बारी फसली. वळसें आज त्यांच्या आंबेगाव विधानसभेच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिरूर तालुक्यातील पाबळ गावात ते पोहचले. गावात यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या घाटात वळसे पोहचले अन त्यांनी बारी मारण्यासाठी माईक हाती घेतला. आगामी निवडणुका लक्षात घेता, वळसेंनी पाण्याचा प्रश्न पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोडवू असं आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा विजय असो, अशा घोषणा देत घाट दणाणून सोडला. हे पाहून वळसेंनी स्मिथ हास्य केलं अन पवार साहेबांवर माझं ही प्रेम आहे. चाळीस वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. मात्र बदलेल्या परिस्थितीमुळं आज मी त्यांच्यासोबत नाही. यावर मी राजकीय व्यासपीठावरून बोलेनचं. मात्र सध्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, तो मी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. यापुढं फार काही बोलत नाही, असं म्हणून वळसेंवर भाषण आटोपते घेण्याची ‘वेळ’ आली. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अशा रीतीने वळसेंची बारी फसवली.

[ad_2]

Related posts