Ashok Chavan first shock to Congress after joining BJP Nanded Municipal Corporation 55 former corporators join BJP marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नांदेड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला (Congress)  मोठा धक्का बसला आहे. सोबतच अनेक आमदार देखील चव्हाण यांच्यानंतर भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला पहिला धक्का दिला आहे. नांदेड महानगरपालिकेतील (Nanded Municipal Corporation) तब्बल 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जातो. 

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यात परतले आहे. शुक्रवारी मोठ्या जल्लोषात अशोक चव्हाण यांचं नांदेड विमानतळावर स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, याची सुरुवात अशोक चव्हाण यांनी सुरू केली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकाच वेळी 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे,आगामी काळात नांदेड महानगरपालिकेतील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली महानगरपालिका भाजपच्या ताब्यात येण्याची देखील शक्यता आहे. 

अशोक चव्हाणांचे ट्विट….

एकाच वेळी 55 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे 55 हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

पंचायत समिती- जिल्हा परिषद सदस्यही भाजपच्या वाटेवर…

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचं वजन आहे. महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि अनेक ग्रामपंचायतीअशोक चव्हाण यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ त्यांचे अनेक समर्थक देखील भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. अशात 55 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील अनेक माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात याचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ashok Chavan : अशोक चव्हाण खासदार होताच नांदेडात बॅनरबाजी; प्रतापराव पाटील चिखलीकर, गिरीश महाजन स्थान नाहीच!

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts