Yavatmal crime News Gutkha and Tobacco seized by Yavatmal police worth of worth 13 lakhs along with vehicle Three arrested maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yavatmal News यवतमाळ : राज्यात गुटखा (Gutkha) आणि तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थावर बंदी आहे. मात्र नव-नवी शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते. आशा छुप्या कारवाईवर पोलिसांकडून(Yavatmal Police) बारीक नजर ठेवली जाते. अशाच एका छुप्या कारवाईचा उमरखेड पोलिसांनी (Crime) भंडाफोड केला आहे. राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा लगतच्या राज्यातील तेलंगणातून पुसदकडे जात असताना पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. यात गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून 13 लाखांच्या गुटख्यासह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोबतच या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

13 लाखांच्या गुटख्यासह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी युनूस खान अन्सार खान (29 रा. हिमायतनगर)  विक्रम शंकर कराळे (23. रा. पुसद) आणि सय्यद अमीर सय्यद खमर (45 रा. हिमायतनगर) या तिघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद पथकाला प्राप्त माहिती नुसार,  शनिवारी पहाटे 5 वाजताच्या सुमार उमरखेड-ढाणकी रोडवरुन तेलंगणातील काही अज्ञात व्यक्ति  मराठवाड्यातील हिमायतनगर येथून पुसदकडे जात आहेत. त्यांच्या बोलेरो पिकअप वाहनात (एमएच 8120) अवैध गुटखा आणि इतर प्रतिबंधित मालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या वाहनाची अडवणूक करून त्याची विचारपुस केली. या चौकशी दरम्यान त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिलीत. यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, यात जवळ जवळ 13 लाखांचा प्रतिबंधित गुटखा घरात लपवून ठेवल्याचे आढळून आले. 

तिघांना अटक 

पोलिसांनी या कारवाईमध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा (Gutkha) आणि तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थाची वाहतूक केल्या प्रकरणी बोलेरो पिकअप वाहन (किंमत 10 लाख रुपये) आणि तीन संशयितांना अटक केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अमित उपलप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.  मात्र या प्रकरणामुळे लगतच्या राज्यातून होणाऱ्या अवैध गुटखा आणि इतर प्रतिबंधित अमली पदार्थांची तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. किरकोळ पैशांच्या मोबदल्यात या अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करण्यात येत असते. मात्र या कारवाई मागे असलेले मोठे मासे शोधून काढणे हे आव्हान आता पोलीसांपुढे असल्याचे बोलले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts