ABP Majha Headlines 26 February 2024 3 PM Maharashtra News manoj jarange maratha resevation maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :  3 PM :  26 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

सागर बंगल्याकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा आंतरवली सराटीत, जमावबंदीमुळे सर्वांना मागे फिरण्याचं आवाहन, मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करुन घेणार, जरांगेंचं स्पष्टीकरण 
छ.संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी, संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी सेवाही तात्पुरती बंद,  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय
फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आजच्या आज सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंची मागणी, तर आज सायंकाळी ५ वाजता भूमिका  स्पष्ट करणार
मनसेची आज मुंबईत लोकसभा आढावा बैठक, ९ मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार, निवडणूक स्वबळावर की मित्रपक्षासोबत यावरही चर्चा अपेक्षित
पणन कायद्यातील दुरुस्तीविरोधात आज बाजारसमित्यांमध्ये एका दिवसाचा लाक्षणिक बंद,  पुणे आणि नाशिकच्या बाजारसमितींमध्ये शुकशुकाट. 
पश्चिम मुंबईत राहणाऱ्यांसाठी खुशखबर, गोखले पुलाची एक मार्गिका आज खुली होणार, ७ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होतं दुरुस्तीचं काम
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, पाच विकेट्स राखून इंग्लंडवर मात, पाच सामन्यांची मालिका ३-१ ने खिशात 

[ad_2]

Related posts