आमदार अण्णा बनसोडे यांचा निराधाराना आधार

(पिंपरी प्रगत भारत ) : पिंपरी विधानसभेचे आमदार यांची ओळख ही तळागाळातील लोकांपर्यत पोहचनारा व त्यांच्यासोबत सुसंवाद साधत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत शासकीय योजना पोहचविणारा नेता अशी आहे.गेली अनेक वर्षे आमदार अण्णा बनसोडे यांच्या वतीने शासकीय योजना व समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यलयलात स्वतंत्र दालन व कर्मचारी वर्ग आहे.विधानसभा क्षेत्रातील  65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा , घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वां पर्यत पोहचून त्यांना संपर्क करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.संजय गांधी निराधार समिती चे अध्यक्ष आंनद बनसोडे यांच्या प्रयत्नाने व आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यत शेकडो लोकांना पेन्शन योजनेचा लाभ घेतला आहे  व त्याचाच एक भाग म्हणून जवळपास शंभर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.कागदपत्रे तपासणे, नसलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत करणे,फॉर्म भरून घेणे व मंजुरी आल्यानंतर बँक खात्यात पैसे मिळे पर्यत या लाभार्थ्यांना आ अण्णा बनसोडे यांच्या मार्फत मदत केली जाते.शासकीय योजना समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी असतात, त्या जर लोकांपर्यत पोहचल्या तर सर्व समाजाची व पर्यायाने देशाची प्रगती होण्यास हातभार लागेल अशी प्रतिक्रिया या वेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.आजच्या मंजूरी पत्र वाटप कार्यक्रमाला संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आनंद बनसोडे,प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमय्या यांच्या सह आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यलयातील कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

Related posts