बहुजन समाज पार्टीच्या परिवर्तन मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे : डॉ. हुलगेश चलवादी

पिंपरी, चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, गुंठेवारीतील बांधकाम नियमित करण्याबाबत शुल्क कमी करणे, महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत उपचार, अनधिकृत बांधकाम, माता रमाई यांचे स्मारक, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक अशा अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी आणि या विषयांचा महानगरपालिकेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुरुवारी (दि.२२) सकाळी ११:३० वाजता बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर परिवर्तन मोर्चा काढण्यात येणार आहे. बसपाचे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ…

Read More

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या बालकांना सोन्याची अंगठी

चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय तामिळनाडू भाजपाने घेतला आहे. त्यासाठी आम्ही चेन्नईतील काही सरकारी रुग्णालये निवडली आहेत. तेथे पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठ्यात दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मत्स्य पालन, सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. याशिवाय अन्य योजना अंतर्गत ७२० किलो मासे मोफत वाटले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी वाटण्यासाठी येणारा खर्च कोण करणार, असा सवाल पत्रकारांनी विचारला तेव्हा त्याला उत्तर देण्याचे मुरुगन यांनी टाळले.…

Read More

शहरातील एन ए प्लॉटसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…

पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- शहरातील रहिवास क्षेत्रातील जमिनी पुन्हा एनए करावे लागते. या जमिनी एनए करताना कराव्या लागणाऱ्या अनेक महिने किंवा वर्ष जातात. परिणामी राज्यातील शहरांमधील किमान रहिवास क्षेत्रातील जागांना पुन्हा एनए करण्याची गरज लागू नये, असा निर्णय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात दिली.नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,…

Read More

पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न – आयुक्त शेखर सिंह

(Pragatbharat.com) पिंपरी, दि. १८ ऑगस्ट २०२२ :-  नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचनात्मक आखणी करून शहराच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी भर दिला जाणार असून वेगाने वाढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आज शेखर सिंह यांनी  स्विकारला. त्यांनतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पदभार स्विकारण्याची प्रक्रिया  पार पडली. त्यानंतर  अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांनी नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. २०१२ च्या…

Read More

नाना काटे सोशल फाउंडेशनतर्फे दहावी, बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मा. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना काटे सोशल फाउंडेशन व नगरसेविका शितल काटे यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील 10 वी व 12 वी परिक्षेतील ५६५ उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, मा. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शीतल नाना काटे, स्वाती उर्फ माई काटे, मायाताई बारणे, माजी नगरसेवक शंकर…

Read More

हर घर तिरंगा अभियान”; आमदार लक्ष्मण जगताप यांनी हातात तिरंगा घेऊन आन-बान-शानने घरोघरी तिरंगा फडकविण्याचे केले आवाहन

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी “हर घर तिरंगा” हा विशेष अभियान राबवण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आज (गुरूवार) हातात तिरंगा घेऊन या अभियानात सहभाग नोंदवला. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाने आन-बान-शानने घरोघरी तिरंगा फडकवून “हर घर तिरंगा” या विशेष अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदवावा. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर घरोघरी तिरंगा फडकवण्याची आपणाला ही संधी आली आहे, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले…

Read More

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

(pragatbharat.com) शिरुर, 11 ऑगस्ट : शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन झालं आहे. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार सुरू होते. बाबुराव पाचर्णे यांच्यावर मागील काही दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कँन्सर सारख्या गंभीर आजाराने पाचर्णे यांना ग्रासले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं. शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाचर्णे यांची अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1978 मध्ये ते शिरूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य झाले. त्यानंतर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवला. त्यानंतर सलग आठ वर्ष ते बाजार समितीमध्ये सभापती राहिले होते. 1993 मध्ये ते…

Read More

यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो : भाऊसाहेब भोईर ……. सोजी जॉर्ज ठरली पिंपरी चिंचवड आयडॉल आणि मोरया करंडकची विजेती

पिंपरी ( Pragatbharat.com) सांस्कृतिक क्षेत्रासह इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्याला शॉर्टकट नसतो. तुम्हाला जागतिक दर्जाचे सिद्ध व्हायचे असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात सातत्य असले पाहिजे. कोणत्याही दुःखावर मात करण्याची क्षमता गायन आणि संगीतात आहे. ज्याचा कान तयार झालेला असतो तो कधीही नैराश्यात जात नाही हे लक्षात ठेवा असा वडिलकीच्या सल्ला ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी दिला.निमित्त होते पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे. उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उबलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील सात वर्षांपासून ज्येष्ठ नगरसेवक आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड…

Read More

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अतिश बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तसेच यावेळी अतिश बारणे यांच्या घरी स्नेह भोजनाचा आस्वाद ही घेतला. या प्रसंगी अजित पवार यांनी अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती घेत आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेत कौतुक केले. तसेच अजितदादांनी केलेले कौतुक माझ्या पुढील वाटचाली साठी नक्कीच ऊर्जा देऊन गेले, असे मत यावेळी अतिश बारणे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे,महिला शहराध्यक्षा कविता ताई आल्हाट, नगरसेवक विक्रांत लांडे, विराज लांडे, नगरसेवक वसंत बोराटे,…

Read More

मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम १० ऑगस्ट २०२२ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

(pragatbharat.com ) पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभाग क्रमांक ३० व पिंपरी परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम तसेच परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षी पिंपरी परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणेसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्याच अनुषंगाने याही वर्षी इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे तसेच परिसरातील गरजू मुलांना शालेय साहित्य…

Read More