शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तशिवसेनच्या पिंपरीतील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…

पिंपरी (दि. २५ जुलै २०२३) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी पिंपरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्व शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिक अशा ११२३ रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग घेवून रक्तदान केले.

कार्यक्रमास विनायक राऊत (खासदार, प्रवक्ते), सचिन अहिर (मा.मंत्री, संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा), रवींद्र मिर्लेकर (उपनेते), माजी आमदार गौतम चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख), लतिका पाष्टे (महिला संपर्क पमुख), शहरप्रमुख सचिन भोसले,  सुलभाताई उबाळे (जिल्हा संघटिक),शैला खंडागळे (जिल्हा संघटिका), केसरीनाथ पाटील (भोसरी व पिंपरी संपर्कप्रमुख), दिलीप घोडेकर (चिंचवड संपर्कप्रमुख), अशोक वाळके (पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी), योगेश बाबर (मा. शहर प्रमुख), सचिन सानप (युवा जिल्हाप्रमुख), संजय दुर्गुळे (मा. नगरसेवक), राम पात्रे (मा. नगरसेवक), रेखा दर्शिले (मा. नगरसेविका), रवी खिल्लारे (मा. नगरसेवक), महादेव गव्हाणे (मा. नगरसेवक) आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या नियोजन समितीचे काम संतोष वाळके (पिंपरी चिंचवड संघटक), कैलास नेवासकर( शहर समन्वयक), रोमी संधू (उपजिल्हाप्रमुख), हाजीभाई दस्तगीर मणियार (उपजिल्हाप्रमुख), निलेश मुटके (उपजिल्हाप्रमुख), अनिता तुतारे (शहर संघटिका), अनंत कोऱ्हाळे (चिंचवड विधानसभा प्रमुख), धनंजय आल्हाट (भोसरी विधानसभा प्रमुख), तुषार नवले, (पिंपरी विधानसभा प्रमुख), संतोष सौंदणकर (चिंचवड विधानसभा संघटक), युवराज कोकाटे (शहर संघटक), सुधाकर नलावडे (उपशहर प्रमुख), श्रीमंत गिरी (उपशहर प्रमुख), हरेश नखाते (उपशहर प्रमुख), संतोष पवार (उपशहर प्रमुख), नवनाथ तरस (उपशहर प्रमुख), अमोल निकम (उपशहर प्रमुख), पांडुरंग पाटील (उपशहर प्रमुख), तुषार सहाणे (शहर संघटक), नितीन दर्शले (विभाग प्रमुख), संदीप भालके (विभाग प्रमुख), दादा नरळे (विभाग प्रमुख), गोरख नवघणे (विभाग प्रमुख), गणेश आहेर, श्रीकांत चौधरी (विभाग प्रमुख), श्री. कृष्णा वाळके (विभाग प्रमुख) यांनी केले.

तसेच महिला पदाधिकारी प्रतीक्षा घुले, मंगला भोकरे (उपशहर प्रमुख), वैशाली कुलथे (उपशहर प्रमुख), रजनी वाघ (उपशहर प्रमुख), वैशाली घोडके, सुजाता नखाते, ज्योती भालके, कामिनी मिश्रा, सुजाता काटे, गीता कुसाळकर, शिल्पा आनपन, कमल गोडांबे, कलावती नाटेकर, ज्योती गायकवाड, सुनिता सोनावणे, हर्षाली घरटे यांनीदेखील नियोजनामध्ये व स्वगातोस्तुक म्हणून काम पाहिले.

माजी आ. गौतम चाबुकस्वार यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. विनायक राऊत (खासदार), सचिन आहिर, रविंद्र मिर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भव्य प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Related posts