सर्व धर्मनिरपेक्ष समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने“महिला व मागासवर्गीयांवरील वाढत्या जातीय अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ पूणे दिघी येथे निदर्शने”

पूणे:पूणे दिघी नांदेड जिल्हयातील अक्षय भालेराव तसेच लातूर जिल्हयांतील गिरीधर तपकाले या युवकांची जातीयद्वेषातून झालेली निर्घृन हत्या, मुंबई येथील सावित्रीबाई फुले वस्तीगृहातील विद्यार्थीनीची झालेली निर्घृन हत्या तसेच दिल्ली येथील राष्ट्रीय खेळाडू असलेल्या महिला अल्पवयीन पैलवान यांच्या वरती झालेला बलात्कार इत्यादि घटनांच्या निषेधार्थ सर्व धर्मनिरपेक्ष समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने गुरूवार दि. २२/६/२०२३ रोजी संभाजीराजे चौक, दिघी, पुणे येथे निदर्शने करण्यात आली. यानंतर याच ठिकाणी निषेध सभा पार पडली या सभेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवेद्रजी तायडे, ॲड. जितेंद्र कांबळे, सौ. अश्विनी कांबळे, जयभारत कुंभारे, राजेंद्र राउत, प्रविण पुणेकर, इत्यादि प्रमुख उपस्थितांनी निषेधपर आपले विचार व्यक्त केले तसेच सरकारकडे या संदर्भात काही मागण्या करण्यात आल्या. महिला व मागासवर्गीयांवरील वाढते अत्याचार, बलात्कार व खून इत्यादि घटनांची सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी. महिलां सरंक्षणाचे कायदे तसेच ॲट्रोसीटी कायदयाची अंमलबजावणी कडक व पारदर्शकपणे करावी. राष्ट्रीय महिला पैलवान व अल्पवयीन पैलवानांवर झालेल्या बलात्कारातील आरोपी खासदार ब्रीजभुषण सिंग यास त्वरीत अटक करण्यात यावी इत्यादि मागण्या या निषेध सभेत करण्यात आल्या. या वेळी श्रीकृष्ण मोरे, सोनू शेळके, आशा सुरवाडे, दिलीप कांबळे, प्रतिभा कांबळे, प्रतिभा बोरकर, केशव वाघमारे, महेंद्र अवचार, चंदा सुरवाडे, लता मोरे, परशुराम सुरवाडे, प्रविण गडलींग, शालिनी कुंभारे इ. प्रमुख सामाजिक व राजकीय क्षेत्रातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts