Sunetra Pawar reaction on baramati loksabha maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sunetra Pawar : बारामतीत अजित पवारांच्या विचाराचे खासदार असतील सुनेत्रा पवार यांचं सूचक विधान राजकारणात भावनेला स्थान नसतं असं म्हणतात. बारामतीत त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या राहणार हे जवळपास निश्चित झाल्यावर, आता सुप्रिया सुळेंनी सुनेत्रांवर थेट हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत पर्स नाही तर नोटपॅड आणि पेन घेऊन जावं लागतं, लोकसभेत नवऱ्याला सोबत नेता येत नाही, असे सणसणीत टोले सुप्रिया सुळेंनी लगावले. त्यांनी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कुणाकडे होता हे सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट आहे. तेवढ्यावरच सुप्रिया सुळे थांबल्या नाहीत. मला मत द्यायचं असेल तर माझ्या कार्याकडे पाहून द्या, माझा नवरा सांगतो म्हणून मत द्या असं मी कधीच म्हटलं नाही अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी आपल्या भावजयवर टीका केली. 

[ad_2]

Related posts