PM Kisan Namo Shetkari MahaSamman Nidhi 4000 will be deposited in accounts of farmers two installments maharashtra marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या (Namo Shetkari Samman Nidhi) गेल्या दोन हप्त्यांचे चार हजार रुपये हे बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे वितरण करण्यात येणार आहे. 

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 200 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. डिसेंबर  ते मार्च महिन्यातील तिसरा हप्त्यासाठी  दोन हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. 

नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 6 हजारांच्या मदतीएवढीच राज्य सरकारची 6 हजार रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. 

केंद्राचा आणि राज्याचा हप्ता एकाचवेळी 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता (डिसेंबर 23 ते मार्च 2024) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000/ असा एकुण रू. 6000/ चा लाभ  राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने  28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts