Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar full PC After Maharashtra Interim Budget 2024 By Ajit Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी  महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर, पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra interim Budget) मांडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत होते. त्यावेळी माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारुन, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक बजेट आहे, असं म्हटल्याचं सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत असताना, अजित पवार हे मध्येच आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी ज्यावेळी त्यांच्या (उद्धव ठाकरेंच्या) सरकारमध्ये होतो, त्यावेळी मी अर्थसंकल्प मांडल्यानंतर फार छान आहे, फार छान आहे म्हणायचे, आता मी इकडे आहे म्हणून म्हणतात, त्याला काय अर्थ आहे, असं अजित पवार म्हणाले.  यानंतर मग लगेचच बाजूला उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “उद्धव ठाकरेंनी यापू्र्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं, मला अर्थसंकल्प कळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

[ad_2]

Related posts