PM Narendra Modi Visit Yavatmal Uddhav Thackeray Group Shiv Sena opposition to PM Narendra Modi marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Narendra Modi Visit Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज यवतमाळ ( Yavatmal)  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या याच दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाने मोदींवर टीका करत पंतप्रधान यांनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आजच्या यवतमाळच्या सभेत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा मोदींना जाब विचारा असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी म्हटले आहेत.  

2014 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे येऊन शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आणि 2019 मध्ये पांढरकवडा येथील महिला मेळाव्यात बचत गटातील महिलांना दिलेले आश्वासन न पाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज महिलांनीच जाब विचारावा असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ मधील भारी गावाजवळ महिला बचत गटांचा महामेळावा होत आहे. लाखोंच्या संख्येने महिला आणि स्थानिक नागरिक या मेळाव्यात उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याच सभेत मोदींना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिले पाहिजे असे म्हणत ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. 

मोदींनी यापूर्वी दोनदा यवतमाळचा दौरा केला, पण आश्वासनं अपूर्णच…

मोदींच्या सभेत कुठलीही अव्यवस्था किंवा गोंधळ होणार नाही, यासाठी पोलिसांनी दक्षता बाळगली आहे. तसेच चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभाव वाढवण्याचे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता केलेली नसल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आरोप आहे. शिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडामध्ये मोदींनी महिला बचत गटाच्या मेळाव्यामध्ये बचत गट आणि महिलांशी संबंधित आश्वासन दिले होते. त्याचीही पूर्तता केली नसल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आरोप असून, आता मोदींना आम्ही नाही तर महिला आणि शेतकऱ्यांनीच विरोध दर्शवत जाब विचारावा असे मत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मोदींच्या उपस्थितीत बचत गटांच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांचा मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. साडेतीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तासाठी आहे. अमरावती परीक्षेत्रासह इतर जिल्ह्यातीलही पोलीस या बंदोबस्तात आहे. एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी यांचे पथक आहे. येणाऱ्या सर्व महिलांची तपासणी करूनच आत सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दीड लाखांहून अधिक बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts