New Zealand Kane Williamson Became Third Time Father Wife Sarah Birth Baby Girl

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kane Williamson New Zealand : न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप झालाय. त्याची पत्नी सारा विल्यमसन हिनं गोंडस मुलीला जन्म दिलाय. बाप झाल्यानंतर केन विल्यमसन यानं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली. केन विल्यमसन याच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. केन विल्यमसन याचे जगभरात चाहते आहेत. तो भारतातही प्रसिद्ध आहे. त्यानं आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. 

केन विल्यमसन याच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हालला आहे. पत्नी सारा विल्यमसन हिनं मुलीला जन्म दिलाय. विल्यमसन याची मोठी मुलगी तीन वर्षांची आहे तर मुलगा एक वर्षांचा आहे. आता त्याच्या पत्नीनं आणखी एका मुलीला जन्म दिलाय. विल्यमसन यानं सोशल मीडियावर आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दरम्यान, विल्यमसनआधी भारताचा क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला. अनुष्का शर्मानं गोंडस मुलाला जन्म दिला. 

सोशल मीडियावर दिली माहिती – 

केन विल्यमसन यानं इन्स्टाग्रामवर आनंदाची बातमी शेअर केली. त्यामध्ये त्यानं पत्नी सारा आणि मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलेय की, “Welcome to the world beautiful Girl. So grateful for your safe arrival and the exciting journey ahead ❤️ ” केन विल्यमसनच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याशिवाय सहकारी खेळाडूंकडूनही विल्यमसनवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विल्यमसनच्या फोटोवर आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त लाईक्सचा वर्षाव झालाय. त्याशिवाय शेकडो कमेंट्स टाकल्या आहेत. 


केन विल्यमसन याला आआधी दोन मुलं आहेत. त्याची मोठी मुलगी 3 वर्षांची आहे, तिचं नाव मॅगी आहे. मुलाचं वय एक वर्षांचं आहे. विल्यमसन सध्या कौटुंबिक सुट्टीवर आहे. तो आपला पूर्ण वेळ पत्नी सारा आणि मुलांसोबत घालवत आहे. विल्यमसनआधी विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झालाय. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनं मुलाला जन्म दिला. कोहली आणि अनुष्का यांनी आपल्या मुलाचं नाव अकाय असं ठेवलेय. विराट आणि अनुष्का यांच्या मुलीचं नाव वामिका आहे.  

आणखी वाचा : 

IND vs ENG : आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो धर्मशाला कसोटीत शतक निश्चित, मैदानात उतरताच रचणार इतिहास! 

केएल राहुल लंडनमध्ये, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह!

धोनीच्या रेल्वेतील पहिल्या नोकरीचं अपॉईंटमेट लेटर व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?

BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप

33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक

BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!



[ad_2]

Related posts