Jalna Unseasonal Rain 11 thousand 691 hectares crops Damage Crops Damage inspection by Jalna Collector marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jalna Unseasonal Rain Crops Damage : मागील दोन-तीन दिवसांपासून मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजरी लावली आहे. यावेळी जोरदार वाऱ्यासह गारपीट देखील पाहायला मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जालना (Jalna) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात गारपिटीमुळे एकाच दिवसात 11 हजार 691 हेक्टर वरील पिकांचे नुकसान (Crops Damage) झाले असून, बाधित झालेल्या 66 गावांमध्ये 20 हजार 800 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. 26 फेब्रुवारी रोजी रात्री जिल्ह्यातील जाफराबाद (Jaffrabad) आणि भोकरदन (Bhokardan) तालुक्यात गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा सह फळपिकांना मोठा फटका बसला. या पावसात 7 जनावरे दगावले असून 2 जणांचा वीज पडून मृत्यू झालाय.

जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी तातडीने भोकरदन तालुक्यातील पारध, दानापूर आणि जाफ्राबाद तालुक्यातील तपोवन,गोंधन, आंबेगाव व टेंभुर्णी या गाव परिसरातील नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश 

संबंधित अधिकाऱ्यांना पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच पिकविमासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्या अडचणी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मानल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार बनकर,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

जालना जिल्ह्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात अचानक झालेल्या पावसात जोरदार गारपीट झाली होती. या गारपिटीने गहू, ज्वारी या प्रमुख पिकांसह फळपिकांच देखील मोठं नुकसान झाले आहेत. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, नळहिवरा,काळेगाव, भातोडी यासह इतर गावांना गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. तर, तिकडे भोकरदन तालुक्यातील पारध, सिपोरा, वाळसांगवी, पद्मावती या गावांना गहू, हरभरा पिकांसह आंब्यासह इतर फळपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Unseasonal Rain: जालना, जळगावात गारपिटीच्या माऱ्याने शेतातली सोन्यासारखी पीकं आडवी; बळीराजा हवालदिल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts