बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबई विमानतळाला फटका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चक्रीवादळ बिपरजॉय चा परिणाम मुंबई विमानतळावर देखील पहायला मिळत आहे. चक्रीवादळात परिणाम विमानसेवेवर झाला असून अनेक विमानांची उड्डाणांना विलंब होत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

बिपरजॉयमुळे वा-याचा वेग अधिक आहे त्यात पाऊस देखील सुरू आहे. यामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणांना विलंबाने उड्डाण घेत आहेत. तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

अहवालानुसार, सहा फ्लाइट्स देखील फिरवल्या आहेत. MH-194, AI-638, UK-652, AI-582, SL-218 (थाई लायन एअर), 6E-5038 ही उड्डाणे फिरवण्यात आली आहेत. 

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळाला अनेक ऑपरेशनल आव्हानांचा सामना करावा लागला. प्रतिकूल हवामानामुळे विमानांचे उड्डाण करणे आणि सुरक्षितपणे उतरणे कठीण झाले. जोरदार वाऱ्यामुळे आणि धुसर दिसत असल्याने विमानतळ अधिकाऱ्यांना धावपट्टी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला. प्रवासी आणि क्रू सदस्यांच्या सुरक्षेसाठी हे उपाय आवश्यक होते.


[ad_2]

Related posts