कोस्टल रोडचा मरीन ड्राइव्ह ते वरळी लेन लवकरच सुरू होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई माहापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजक्ट असलेला कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील किनारी (कोस्टल ) मार्गाचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा विभाग येत्या आठ दिवसात सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात पूर्ण होणार आहे.

मुंबईतला कोस्टल रोड लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत 70 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत होणारेय. मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर केवळ आठ मिनिटात कापता येणारेय कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.  वरळी ते मरीन ड्राईव्ह असा 9 किलोमीटरच्या कोस्टल रोड आहे. या चारपदरी मार्गावर ताशी 80 ते 100 किमी वेगाने वाहने धावतील. 

कोस्टल रोडवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त असणार आहे. रोडवर एन्ट्री, एक्झीट, बोगद्यासह 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. भुयारी मार्गावर प्रत्येक 100 मीटरवर पब्लिक अॅड्रेस स्पिकर बसवण्यात आलेत.  विशेष म्हणजे या रस्त्यावर बसेसलाही परनानगी दिली जाणार आहे.


हेही वाचा

कांदिवली लोखंडवाला ते गोरेगाव पूर्व कनेक्टिव्हिटीच्या कामाला सुरुवात


गोखले ब्रिजवर सध्या ‘याच’ वाहनांना परवानगी

[ad_2]

Related posts