Uttam Jankar to join bjp leaving ajit pawar ncp Solapur Lok Sabha Election maharashtra politics marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Election) उमेदवारीसाठी इच्छुक असणारे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी भाजप प्रवेशाची तयारी केली असून तो अजित पवार यांना धक्का मानला जात आहे. उत्तम जाणकार हे माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते असून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपकडून निसटता पराभव झाला होता . 

उत्तम जानकर हे धनगर समाजाचे असले तरी त्यांनी धनगर खाटीक या जातीसाठी असणारा अनुसूचित जातीचा दाखल मिळविला आहे. हा दाखल मुंबई उच्च न्यायालयाने व्हॅलिड ठरविला असून सर्वोच्च न्यायालयात देखील जानकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता ते सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

लहानपणापासून भाजपचे विचार

उत्तम जानकर म्हणाले की, आपण लहानपणापासून भाजप विचाराचे असून गेल्यावेळी उमेदवारी न मिळाल्याने रागावून आपण राष्ट्रवादीतून निवडणूक लढविली होती. मात्र आपण काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असून त्यांनी मतदारसंघाचा कानोसा घ्यावा असा सल्ला दिला होता. यानंतर आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनेक सर्वे केले असून हे सर्व सर्व्हे भाजप आणि आपल्यासाठी फायदेशीर आहेत. 

लोकसभेची तयारी सुरू

आपल्याला भाजपने उमेदवारी दिली तर आपण अजितदादांना सांगून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणार असल्याचंही उत्तम जानकर यांनी सांगितले आहे. एकंदरीत सोलापूर लोकसभेसाठी भाजपमध्येच अनेक इच्छुक उमेदवार असताना आता राष्ट्रवादीत असणाऱ्या उत्तम जानकर यांना कितपत संधी मिळणार हा प्रश्न विचारला जात आहे. असं असलं तरी जानकर यांनी मात्र यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. 

प्रणिती शिंदेंचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर

सोलापुरातून काँग्रेकडून प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. तशी तयारीही त्यांनी सुरू केल्याचं दिसतंय. सोलापुरात सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी हे खासदार आहेत. पण यंदाच्या निवडणुकीत भाजप त्यांना तिकीट देण्याची शक्यता नाही अशी चर्चा आहे. भाजपने या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचमुळे भाजपमध्ये आता इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच आता उत्तम जानकर यांचीही भर पडताना दिसत आहे. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts