Sharad Pawar News Now Sharad Pawar s name on invitation of Namo Rojgar Melava baramati after the controversy latest maharashtra Politics pune marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Political News : नमो रोजगार मेळाव्याच्या (Namo Rojgar Melava) कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव टाकण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. वादानंतर प्रशासनाची सारवासारव केल्याचं म्हटलं जात आहे. बारामतीमध्ये शनिवारी नमो रोजगार मेळावा (Baramati Namo Rojgar Melava) पार पडणार आहे. गुरुवारी सुप्रिया सुळे यांना दिलेल्या पत्रिकेत शरद पवारांचे नाव नव्हतं. मात्र, आता कार्यक्रमाच्या नवीन पत्रिकेत शरद पवारांचं नाव असल्याची ‘एबीपी माझा’ला माहिती मिळाली आहे. गुरुवारी निमंत्रण पत्रिकेवर झालेल्या वादानंतर आता सारवासारव केल्याची माहिती समोर आली आहे. 

नमो रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेवर आता पवारांचं नाव

नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बारामतीत येणार आहेत. जुलै 2023 मध्ये पवारांविरोधात उघड भूमिका घेणारे अजित पवार या भोजनाला जातात का ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण दिवाळीनंतर पवार काका-पुतण्या समोरासमोर आलेले नाहीत. अलीकडेच अजित पवारांनी अनेकदा आपल्या काकांवर सडकून टीका देखील केलीये. त्यामुळे शिंदे, फडणवीस यांनी जर भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं, तर अजित पवारही ते स्वीकारणार का ते पाहावं लागेल. 

निमंत्रण पत्रिकेच्या वादानंतर प्रशासनाची सारवासारव

बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शनिवारी आणि रविवारी नमो रोजगार मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या शनिवारी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं, यानंतर सरकारवर टीका करण्यात येत होती. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असून ते राज्यसभेचं प्रतिनिधीत्व करतात, या कार्यक्रमाला राज्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही, असा अर्थ होतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यानंतर आता सरकारने सारवासारव करत नवीन निमंत्रण पत्रिका काढली असून त्यामध्ये शरद पवाराचं नाव नमूद करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts