blog on sandeep ramdasi on sharad pawar invitation to eknath shind devendra fadanvis ajit pawar for lunch baramati namo rojgar melava marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BLOG : कार्यक्रम बारामतीत होत असताना, पवारांच्या संस्थेत होत असताना कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवारांचं नाव टाकायचं नाही असा निर्णय ज्याला थोडंफार राजकारण कळतं असा कोणीही व्यक्ती ठरवून घेईल असं वाटत तर नाही. ज्याच्या चुकीमुळे कार्यक्रमपत्रिकेवर नाव टाकायचं राहिलं असेल किंवा नाव टाकायचं नाही असं खरंच एखाद्याने ठरवलं असेल तर त्याने शरद पवारांची खूप मोठी मदतच केली आहे. 

नमो रोजगार मेळावा म्हणजे वरवर पाहता एक रुटीन सरकारी कार्यक्रम. पण शरद पवारांच्या एकामागोमाग अचूक खेळींमुळे तो एकदम राजकीय मुत्सद्देगिरीच्या केंद्रस्थानी आला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. आमंत्रण स्वीकारलं तरी पंचाईत आणि नाही स्वीकारलं तरी पंचाईत अशी स्थिती शिंदे-फडणवीस-पवार यांची झाली असेल. त्यातही बारामतीची मोठी लढाई लढायच्या तयारीत असलेल्या अजितदादांसमोरचा पेच जास्त मोठा असेल. 

अर्थात देवेंद्र फडणवीसांनी जेवणाचं आमंत्रण नाकारण्यासाठी पत्रात दोन अतिशय महत्वाची कारणं दिली आणि बॅलन्स काही प्रमाणात साधला. संभाजी महाराज आणि लहुजी वस्तादांच्या स्मारकाच्या भूमीपूजनापुढे शरद पवारांचं आमंत्रण काहीच नाही असा संदेश त्यातून दिला. 

ग्राऊंडवरच्या लढाई इतकीच परसेप्शनची लढाई किती महत्वाची आहे हे आपण पाहात आलो आहोत. या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच गुरूवारी रात्री आणि आज सकाळी सुप्रिया सुळेंनी व्हाट्सप स्टेटसला बारामतीतून लढणार असल्याचे दोन फोटो ठेवून आपली उमेदवारी जाहीर केली आणि एकप्रकारे प्रचाराचा श्रीगणेशाच केला.

शरद पवार हे मुरलेले, कसलेले, मुरब्बी राजकारणी का आहेत याची झलक नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळाली. रोजगार मेळाव्याच्या नो बॉलवर पवारांनी रन्स काढून घेतल्या आहेत असं म्हणता येईल. फडणवीसाच्या उत्तरानं आणखी एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न फसला असंही म्हणावं लागेल.

या लेखकाचा हा ब्लॉग वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts