IND vs AUS Ravi Shastri Furious On Coach Player And Bcci After WTC Final Loss ; WTC फायनल गमावल्यानंतर रवी शास्त्री भडकले, BCCIसह सर्वांना एका वाक्यात सुनावले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ओव्हल: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून मोठा पराभव स्विकारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे फार निराश झाले. टीम इंडियाच्या या पराभवानंतर त्यांनी अनेक गोष्टींवर थेट शब्दात सुनावले. लंडनमधील द ओव्हल मैदानावर झालेल्या फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा २०९ धावांनी पराभव झाला.

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड म्हणाले की, संघासाठी ही एक आदर्श स्थिती असती जर ते कमीत कमी दोन आठवडे आधी इंग्लंडमध्ये पोहचली असती आणि काही सराव सामने खेळले असते.

WTC फायनलच्या पराभवानंतर ५ जणांची हकालपट्टी निश्चित, भारताच्या कसोटी संघात पुन्हा संधी नाही
भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांकडून होणाऱ्या टीकेवर आता रवी शास्त्रींनी थेट आणि स्पष्ट शब्दात सुनावले आहे. भविष्यात आयपीएलचा हंगाम आणि WTC चॅम्पियनशिपची फायनल यात फार वेळ मिळेल असे वाटत नाही. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा या संबंधित सर्व भागधारक (बीसीसीआय आणि आयपीएलमधील संघ) यांच्या विचारात बदल होईल.

रवी शास्त्रींना कोच द्रविड यांचे मत पटले नाही. याची जबाबदारी त्यांनी खेळाडूंवर टाकली. स्टार स्पोर्ट्सवर बोलताने ते म्हणाले, असे कधीच होणार नाही. तुम्हाला वास्तववादी व्हावे लागले. तुम्हाला २० दिवस तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही आयपीएलमधून बाहेर व्हाल. ही गोष्टी तुमच्या आवडीची आहे.

वनडे World Cupचे वेळापत्रक ड्राफ्ट, ८ ऑक्टोबरला चेन्नईत पहिली मॅच; असे आहे टीम इंडियाचे शेड्यूल
शास्त्री पुढे जाऊन हे देखील म्हणाले, भारतीय क्रिकेट बोर्डाला ठरवावे लागले की पुढील मार्ग कसा तयार करायचा आहे. यासाठी आयपीएलमधील संघांसोबत चर्चा करावी लागले. मला विश्वास वाटतो की, बीसीसीआय याच्यावर नक्की विचार करेल. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे नियोजन आयपीएलनंतर जून महिन्यात होते. त्यामुळे तेव्हा हंगामात आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघांसाठी वेगळे नियम करावे लागतील.

टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी खराब शॉटची निवड केल्यावरून देखील शास्त्रींनी टीका केली होती. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांना स्वत:च्या शॉट बद्दल वाईट वाटत असेल. ते चांगली फलंदाजी करत होते आणि खराब शॉट खेळून बाद झाले, असे शास्त्री म्हणाले.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts