Maharashtra Politics MVA Seat Sharing Issue Disagreement over seat allocation continues in Mahavikas Aghadi there is still no agreement on 15 seats Maharashtra lok sabha election 2024 marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra News : आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) सर्व पक्षांकडून जागावाटपांची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाबाबत मोठी माहिती सध्या समोर येत आहे. महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपावरून मतभेद कायम असल्याचं सांगितलं जात आहे. 

महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद कायम

महाविकास आघाडीतील जागांमध्ये 15 जागांवर मतभेद कायम असल्याची माहिती समोर येत आहे. कांग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अजूनही 15 जागांवर सहमती नाही, असं माहिती आहे. 12-12-9 प्रमाणे तिन्ही पक्षांकडून जागावाटप पूर्ण झालं आहे, पण इतर 15 जागांबाबत अजून संभ्रम कायम आहे.

मविआची 15 जागांवर अजूनही सहमती नाही

महाविकास आघाडीत 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण झालं असून 15 जागांचा तिढा मात्र कायम आहे.10 जागांवर कांग्रेस विरुद्ध शिवसेना मतभेद तर उर्वरीत 5 जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि कांग्रेस नेत्यांच्या 5 किंवा 6 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

काँग्रेस vs शिवसेना मतभेद असलेल्या 10 जागा : 

औरंगाबाद

जालना

हिंगोली

कोल्हापूर

मुंबई दक्षिण मध्य

उत्तर पूर्व मुंबई

यवतमाळ-वाशिम

अमरावती

रामटेक

शिर्डी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts