BJP leader and former cricketer Gautam Gambhir has decided not to contest Loksabha Election 2024 east delhi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भाजप नेता आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. गौतमने म्हटले आहे की, मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेन. गौतम गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून पहिल्यांदाच संसदेत पोहोचला होता. 

गौतमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लिहिले की, मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद.’ आता पूर्व दिल्लीतून भाजप कोणत्या उमेदवाराला तिकीट देते हे पाहावे लागेल.

पहिली यादी येण्यापूर्वीच गौतमची ‘इलेक्शन रिटायरमेंट’!

गौतम गंभीरने निवडणूक न लढवण्याचा निर्णय अशावेळी घेतला आहे, जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत ज्या जागांवर पक्ष आधीच विजयी झाला आहे, त्या जागा आणि उमेदवारांची नावे असतील, अशी जोरदार चर्चा आहे.यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांसारख्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश असू शकतो. भाजपच्या पहिल्या यादीत ज्या जागांची घोषणा होऊ शकते त्यात वाराणसी, गांधीनगर, अमेठी, नागपूर, लखनौचा समावेश असू शकतो.

गौतम यांची राजकीय कारकीर्द कशी होती?

गौतम गंभीरने 2019 पासून राजकीय खेळपट्टीवर फलंदाजीला सुरुवात केली. मार्च 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली तेव्हा गंभीरला पूर्व दिल्लीच्या जागेवरून उमेदवारी देण्यात आली. पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे ते जगले आणि येथून विजयी झाले. त्यांच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी मार्लेना आणि काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली हे रिंगणात होते.

भाजपमध्ये आल्यापासून दिल्लीतील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आप सरकारला कोंडीत पकडलं आहे. गंभीर अनेकदा पूर्व दिल्लीतील गाझीपूर लँडफिलला भेट देताना दिसला आहे आणि त्याची साफसफाई करण्याची मागणी करत आहे. कोविड महामारीच्या काळात आपला दोन वर्षांचा खासदाराचा पगारही दान केला. सभागृहात चर्चा करतानाही ते अनेकदा दिसले. मात्र, अनेकवेळा त्याच्या क्रिकेटच्या वचनबद्धतेमुळे वादात सापडला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts