Ishan Kishan was approached by the Indian cricket team management during the India vs England Test series Dhruv Jurel

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ishan Kishan, Dhruv Jurel : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकताच वार्षिक करार जाहीर करण्यात आला. यामध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोन प्रमुख खेळाडूंना स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे ते सातत्याने चर्चेत आहेत. अलीकडील काळात टीम इंडियासाठी सातत्यपूर्ण क्रिकेट खेळूनही, दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग न घेण्यामुळे बीसीसीआयने त्यांना दणका दिला आहे. 

इशान किशनने भारत-इंग्लंड कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला?

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने इशान किशनशी संपर्क साधला होता. किशनने तो अजून तयार नसल्याचे सांगत ऑफर नाकारली होती. अशा परिस्थितीत त्याच्या जागी युवा ध्रुव जुरेलला संधी मिळाली आणि किशनच्या अनुपस्थितीत त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. ध्रुव जुरेलच्या दोन्ही डावातील खेळी टीम इंडियाच्या चौथ्या कसोटीतील किंग मेकर ठरल्या.

इशान-अय्यर केंद्रीय करारातून का बाहेर पडले?

बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यरला वगळण्याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. मात्र, मंडळाने याबाबत निश्चितच इशारा दिला. बीसीसीआयने म्हटले आहे की, ‘सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यास प्राधान्य द्यावे.’ 17 डिसेंबरला इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला. मात्र, इशान किशन या वेळेचा वापर राष्ट्रीय संघापासून दूर देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी करेल, अशी अपेक्षा होती. पण त्याने आपल्या राज्य संघ झारखंडच्या रणजी सामन्यांमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, इशानला संघात परतण्यासाठी क्रिकेट खेळण्याची गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.

त्याचप्रमाणे श्रेयस अय्यरलाही दुखापतीमुळे मुंबईच्या रणजी सामन्यात सहभागी होता आले नाही. मात्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्याच्या दुखापतीबाबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अहवालाने हा दावा फेटाळून लावला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts