Rahul Gandhi : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, ठाण्यात धडकणार भारत जोडो न्याय यात्रा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे (Thane) जिल्ह्यात धडकणार आहेत. दि. 15 आणि 16 मार्चला राहुल गांधी ठाण्यात येतील. यावेळी त्यांची सभादेखील आयोजित करण्यात आली आहे. आगामी लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राहुल गांधी काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही यात्रा 12 मार्चला गुजरातमधून राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे ती १५ मार्चला वाडा, भिवंडी येथे येईल. दि. 15 आणि 16 मार्चला ही यात्रा ठाणे धडकेल. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सभा होणार आहे. यानंतर ही यात्रा मुलूंड येथे थांबेल आणि 17 मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. 

महाविकास आघाडीच्या बैठकीला राहुल गांधींची उपस्थिती

संपूर्ण देशात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. पहिल्या टप्यातील यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्या आहे. आता त्यांनी दुसऱ्या टप्यात भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी करण्यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ठाणे काँग्रेस मुख्यालयात बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी

राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणेचे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. तो माथेफिरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून संबंधित व्यक्तीवर पोलसांची नजर कायम आहे. राहुल गांधीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  

नाशिकला राहुल गांधी घेणार काळारामाचे दर्शन 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जानेवारीमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram Mandir) भेट दिली. मोदी आणि ठकारे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा करण्यात आली होती. आता काँग्रेस नेते राहुल गांधी हेदेखील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. नाशिकच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या स्वागताची जोरदार तयारी केली जातेय.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts