What Will Be Shivsenas Take On India And Pakistan Match Taking Place In Ahmedbad Stadium Marathi News | India VS Pak Shivsena : अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


यंदाच्या ऑक्टोेबर महिन्यात क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे, ज्याचं यजमानपद भारताकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. याच मुद्द्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण पाकिस्तानी संघानं भारतात खेळण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत, तर आशिष शेलार हे खजिनदार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत ठाकरे गट आणि शिवसेना काय भूमिका घेतात, ते पाहावं लागेल. 

[ad_2]

Related posts