yavatmal washim lok sabha election MLA Kiran Sarnaik joins Shinde shiv sena Party entry in the presence of Chief Minister Eknath Shinde maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yavatmal Washim वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज वाशिमच्या (Washim) दौऱ्यावर आहेत. स्थानिक खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) च्या पुढाकाराने वाशिम शहरात होत असलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत. साधारणतः एकाच आठवड्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाची ही गळती अद्याप सुरूच असल्याचे चित्र आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे 84 आजी-माजी  सरपंच, नगर सेवक, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य उबाठा गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. असे असतांना आणखी एक आमदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती पुढे आली आहे.

आणखी एका आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

अमरावतीचे अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. वाशिम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक हे अपक्ष आमदार असले तरी मूळचे काँग्रेसवासी आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उबाठा गटाच्या शिवसेने पाठोपाठ आता काँग्रेसला देखील हा एक धक्का असल्याचे बोलले जात आहे. आज खासदार भावना गवळी यांनी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार किरण सरनाईक यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने लोकसभा निवडणुकीत निश्चित याचा फायदा भावना गवळी यांना होणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. 

किरण सरनाईक आहेत तरी कोण ?

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अ‍ॅड. किरण सरनाईक यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. किरणराव सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था त्यांचे वडील दिवंगत अप्पासाहेब सरनाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्थापन केली होती. सरनाईक हे काही काळ अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्षही होते. त्यांचे वडीलही विदर्भ काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी होते. विशेष म्हणजे मागील 50 वर्षांपासून सरनाईक घराणं हे काँग्रेस पक्षाच्या सोबत होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशिम दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत आमदार किरणराव सरनाईक यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts