Most Controversial Moments In IPL Since 2008 Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Biggest IPL Controversies : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) तीन आठवड्यात सुरुवात होईल. टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या रनसंग्रामाकडे अवघ्या साऱ्या जगाचं लक्ष लागलेय. जगातील सर्वात चर्चेत असणारी ही क्रिकेट लीग 2008 मध्ये (IPL 2008) सुरु झाली. आतापर्यंत या लीगने अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिले आहेत. आयपीएल स्पर्धेने भारतीय क्रिकेटचं रुपडे बदललं आहे. पण, आयपीएलच्या या स्पर्धेत अनेकदा वादही (IPL Controversies) झाले आहेत. पाहूयात, मागील 16 हंगामात आयपीएलमध्ये झालेले सर्वात मोठे वाद..

1- स्पॉट-फिक्सिंग – 

2013 मध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला डाग लागला. कारण, 2013 मध्ये तीन खेळाडूंवर स्पॉट फिग्सिंगचा आरोप लागला. यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदीला यांना अटक कऱण्यात आली. या तिन्हीही खेळाडूंवर अजीवन बंदी घालण्यात आली. श्रीसंतने आपल्यावरील बंदीला कोर्टत दाद मागितली अन् कोर्टाकडून दिलासा मिळाला. पुन्हा त्याला खेळण्याची परवानगी मिळाली. पण नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात त्याला कुणीही खरेदी केले नाही. 

2- चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघावर बंदी – 

सट्टेबाजी केल्याच्या आरोपा झाल्यानंतर चेन्नई आणि राज्यस्थान संघाला दोन वर्षासाठी आयपीएलमधून बॅन करण्यात आले होते.  चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्राही यामध्ये दोषी आढळले होते. 

3- शाहरुख खानवर निर्बंध- 

आयपीएल 2012 मध्ये केकेआरचे मालक शाहरुख खान याच्यावर वानखेडे स्टेडिअमवर बंदी घालण्यात आली होती. मैदानावरील कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप शाहरुख खानवर होता. 2015 नंतरही ही बंदी उठवण्यात आली.

4- हरभजन सिंह आणि श्रीसंत विवाद –

आयपीएलमधील पहिला वाद पहिल्या हंगामातच झाला होता. फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याच्या कानाखाली मारली होती. 25 एप्रिल, 2008 रोजी मोहालीमध्ये किंग्स इलेवन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर श्रीसंत रडत असल्याचे दिसले. भज्जीने श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर भज्जीला 11 सामन्यासाठी बंदी लावण्यात आली होती. 

5- ललित मोदीवर अजीवन बंदी 

आयपीएलचा प्लॅन ललित मोदी यांचा आहे. ललित मोदी यांनीच आयपीएलच्या लीगची सुरुवात केली होती. पण 2010 मध्ये त्यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार करण्याचा आरोप होता. त्यानंतर ललित मोदी यांना बीसीसीआयने निलंबीत केले. त्यानंतर तपासानंतर त्यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली. 

6. कोहली आणि नवीनमधील वाद

आयपीएलमधील इतिहासातील सर्वात मोठा वाद कोणता? तर विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील वाद सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो. गजबजलेल्या मैदानात भर सामन्यादरम्यान हा वाद झाला होता. 1 मे 2023 रोजी झालेल्या आयपीएल सामन्यात बंगळुरूनं लखनौचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात वाद झाला होता. या वादानं स्टेडियमचं टेम्परेचर खूपच वाढलं होतं. यानंतर सामना संपल्यावर कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तू-तू, मैं-मैं झाली होती. तेव्हा या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. सोशल मीडियावरही चाहतेही भिडले होते.    

7. ड्रग्ज प्रकरण 2012 – 

2012 मध्ये पुणे वॉरियर्स संघाचे दोन खेळाडू ड्रग्ज प्रकरणात अडकले होते.वेन पार्नेल आणि राहुल शर्मा हे दोन खेळाडू एका पार्टीमध्ये आढळले होते. ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी या दोघांसह इतरांनी अटक केली होती. त्यावेळी या दोन्ही खेळाडूंनी नार्को टेस्ट करण्यास नकार दिला होता. पण ते पॉझिटिव्ह आढळले होते. याप्रकरणी कोणताही मोठी कारवाई करण्यात आली नाही. पण 2012 आयपीएलमधील हे प्रकरण चांगलेच गाजलं होतं.

आणखी वाचा :

IPL 2024 : आले किती गेले किती… IPL चे 10 रेकॉर्ड्स अबाधित, वाचून तुम्ही व्हाल चकीत!

Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यरची खराब कामगिरी सुरुच, रणजी स्पर्धेतही फ्लॉप शो!

IPL 2024: राजस्थान रॉयल्स दिसणार नव्या रुपात, आयपीएल 2024 साठी नवी जर्सी रिलीज

रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!

तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!

Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट… रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला ‘नवा’ अश्विन!

IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार

[ad_2]

Related posts