Koradi Thermal Plant workers Strike Contract workers of Koradi Thermal Power Station on strike nagpur maharashtra Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Koradi Workers Strike, Nagpur : नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रीतील कंत्राटी वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता मध्य रात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे 42 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, यासह इतरही मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 28 आणि 29 फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

मागण्या मान्य न झाल्याने काम बंद आंदोलन

नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात  660 मेगावॅटचे एकूण तीन संच आहे. येथे रोज 1960 मेगावॅट विजेची निर्मिती होते. या संपात येथील सहा हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असल्याने पुढील काळात येथील वीज निर्मितीवर याचा परिणाम होण्याच्या शक्यता आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts