IPL 2024 Shoaib Akhtar To Shahid Afridi Top Pakistan Cricketers Who Played In IPL

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistani Cricketer in IPL : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होतोय. पहिला सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. आरसीबीचं नेतृत्व फाफ डु प्लेसिस करणार आहे. दोन देशातील राजकीय संघर्षानंतर आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडू खेळताना दिसत नाहीत. पण यापूर्वी काही पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएल गाजवली आहे. यामध्ये दिग्गजांचा समावेश राहिलाय.  

सर्वाधिक पाकिस्तानी खेळाडू केकेआरमधून खेळलेत 

2008 च्या आयपीएल सीझननंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नव्हते आणि राजकीय तणावामुळे पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलच्या 2008 च्या सीझनमध्ये पहिली आणि शेवटची संधी मिळाली होती. 

आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये एकूण 8 संघ होते, त्यापैकी फक्त पाच संघातच पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. 2008 च्या मोसमात शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि शोएब अख्तरसह 11 खेळाडूंना संधी देण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मध्ये सर्वाधिक 4 पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळले होते. यामध्ये सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज आणि उमर गुल यांचा समावेश होता.

‘या’ तिन्ही संघात पाकच्या खेळाडूंना संधी मिळालीच नाही

राजस्थान रॉयल्स (RR) संघात कामरान अकमल, युनूस खान, सोहेल तन्वीर या तीन खेळाडूंना संधी मिळाली. तर 2 खेळाडू मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक यांना दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) संघात स्थान मिळालं होतं. हैदराबादचा संघ डेक्कन चार्जर्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) मध्ये 1-1 खेळाडूाला स्थान मिळालं होतं. हैदराबादनं शाहिद आफ्रिदीला आणि बंगळुरूच्या संघानं मिसबाह-उल-हकला संघात स्थान दिलं होतं. 

चेन्नई सुपर किंग्स (CSK), किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) आणि मुंबई इंडियन्स (MI) या संघातून मात्र आतापर्यंत एकही पाकिस्तानी खेळाडू खेळला नाही. राजस्थान रॉयल्समधून खेळत असलेल्या सोहेल तन्वीरनं एका सामन्यात 6 बळी घेण्याचा विक्रम केला होता, जो 11 वर्षे टिकला होता. 

2008 मध्ये कोणत्या संघात किती पाकिस्तानी खेळाडूंना मिळाली जागा 
केकेआरमध्ये 4 प्लेयर्स खेळले : सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हफीज आणि उमर गुल शामिल
राजस्थानच्या संघात 3 प्लेयर्स खेळले : कामरान अकमल, यूनुस खान, सोहेल तनवीर
दिल्ली संघात 2 पाकिस्तानी प्लेयर्स : मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक
हैदराबादचा संघ (डेक्कन चार्जर्स) शाहिद आफ्रीदी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधून मिस्बाह उल हक हे दोघे खेळले होते. 

आणखी वाचा :

IPL मध्ये 22 वेळा हॅट्ट्रिक! रोहितनं एकदा, युवीनं दोनदा केला करिश्मा; पाहा संपूर्ण यादी

कोहली-गंभीर, स्पॉट फिक्सिंग ते शाहरुख खान बॅन, IPL मधील मोठे वाद

IPL 2024 : आले किती गेले किती… IPL चे 10 रेकॉर्ड्स अबाधित, वाचून तुम्ही व्हाल चकीत!

IPL 2024: राजस्थान रॉयल्स दिसणार नव्या रुपात, आयपीएल 2024 साठी नवी जर्सी रिलीज

रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!

तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!

Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट… रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला ‘नवा’ अश्विन!

IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार

[ad_2]

Related posts