Mahayuti Seat Allocation may Declare tomorrow Maharashtra Politics Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahayuti :महायुती जागावाटपावर उद्या शिक्कामोर्तब, शाहांसोबतच्या बैठकीनंतर उमेदवार घोषणेची शक्यता
महायुतीच्या जागावाटपावर उद्या शिक्कामोर्तब, शाहांसोबतच्या बैठकीनंतर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता 
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या महाराष्ट्रातल्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे. पण सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरहून रात्री पावणेदहाच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. तिथून ते सव्वा दहाच्या सुमारास मलबार हिल येथील सह्याद्री या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. अमित शाह हे आज रात्री आधी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत. आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात कोणत्या जागा लढवण्यासाठी उत्सुक आहे, याची माहिती अमित शाहांना देण्यात आली आहे. आज रात्रीच्या बैठकांनंतर अमित शाह हे महायुतीच्या नेत्यांसोबत उद्या बैठक घेतील. त्या बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

[ad_2]

Related posts