IND Vs ENG 5th Test In Dharamsala England And Their Fans Feel At Home

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे.  लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरणार आहे. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडच्या अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरला. भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशाखापट्टणम कसोटीत भारताने 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर रांची कसोटीत पाच विकेटने मात केली. आता अखेरचा सामना जिंकून शेवट गोड कऱण्यासाठी साहेब मैदानात उतरली. तर भारतीय संघही विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दरम्यान, बॅझबॉल आल्यानंतर इंग्लंड सलग सात कसोटी मालिकेत अजेय होता, पण भारताच्या भूमीत त्यांना पराभव पाहावा लागलाय.

सात मार्चपासून धरमशालाच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना सुरु होणार आहे. हा सामना जिंकून विजयी चौकार मारण्याचा प्रयत्न भारत करेल. भेदक मारा करणारा जसप्रीत बुमराह टीम इंडियात परतलाय, त्यामुळे गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. दुसरीकडे फलंदाजीमध्ये रजत पाटीदारला बेंचवरच बसावं लागू शकतं. त्याच्याजागी रजत पाटीदारला स्थान मिळण्याची शक्यता आहे.

पाचवा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?

मालिकेतील अखेरचा कसोटी सामना सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होईल. 

कुठे पाहाल अखेरचा सामना ?

जिओ अॅपवर मोफत सामना पाहता येईल. टिव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनलवर सामना पाहता येईल. त्याशिवाय सामन्यासंदर्भातील सर्व अपडेट एबीपी माझाच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

तीन टप्प्यात होईल प्रत्येक दिवसाचा खेळ – 

पाचव्या कसोटी मालिकेतील दिवसाचं पहिलं सत्र दोन तासांचं असेल. म्हणजे, 11.30 वाजेपर्यंत पहिल्या सत्रात सामना होईल. त्यानंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक असेल. दुपारी 11.10 वाजता पुन्हा सामन्याला सुरुवात होईल. दुसरं सत्रही दोन तासांचं असेल. भारतीय वेळानुसार, दुपारी 2.10 वाजता चायपाण्याचा ब्रेक असेल. 20 मिनिटांच्या या ब्रेकनंतर अखेरच्या सत्राला सुरुवात होईल. 2.30 मिनिटांनी अखेरच्या सत्राला सुरुवात होईल.  4.30 वाजता दिवसाचा खेळ संपेल. 

[ad_2]

Related posts