Maratha protesters aggressive in Parbhani Black color Paint of political leaders Banners Maratha Reservation Manoj Jarange marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

परभणी : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणीसाठी परभणीत मराठा आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना (Pratap Patil Chikhalikar) मराठा आंदोलकांनी अडवल्याची घटना ताजी असतानाच, आता परभणीत राजकीय नेत्यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले आहेत. यावेळी तरूणांची जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. 

परभणी तालुक्यातील शहापूर येथे आज पाच कोटी रुपयांच्या रस्त्याचा शुभारंभ होणार आहे. या अनुषंगाने शहापूरमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार डॉ. फौजिया खान, सेनेचे खासदार बंडू जाधव, सेनेचे आमदार राहुल पाटील तसेच काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. मात्र, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चौकशीच्या अनुषंगाने नाराज असलेल्या मराठा समाजातील तरुणांनी या बॅनरला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘या राजकारण्यांचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

परभणीत मराठा समाज आक्रमक

परभणी जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होतांना दिसतोय. काल खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अडवत मनोज जरांगे पाटील यांच्याऐवजी आदर्श घोटाळ्याची एअसायटी चौकशी लावा असा सवाल विचारण्यात आला. त्यानंतर आता परभणीतील शहापूरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून परभणीत मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. 

मनोज जरांगे ओबीसी आरक्षणावर ठाम…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच आपल्या याच मागणीवर आपण ठाम असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच असणार असल्याचे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचा देखील आरोप जरांगे यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मराठा आंदोलक आक्रमक, चिखलीकरांचा ताफा अडवला; आदर्श घोटाळ्याचीही एसआयटी लावण्याची केली मागणी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts