मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरला आग, दोघांचा होरपळून मृत्यू, वाहतूक ठप्प

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागल्याची घटना घडली आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी आला. त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे.

टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे. यामुळे आग वेगाने पसरली. या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकरला आग लागली. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून सध्या लोणावळा शहरातून वाहतूक वळवण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा

[ad_2]

Related posts