maharashtra seat sharing shiv sena eknath shinde ncp ajit pawar group possibly get 10 seats and bjp may fight 32 maharashtra politics 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राज्यातील महायुतीच्या जागावाटपाच्या (Maharashtra Mahayuti Seat Sharing) चर्चेवर दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं होत असून ती अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय. त्यामध्ये भाजपकडून (BJP) राज्यात 32 जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाला सिंगल डिजिट जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसतंय. अजित पवार गटासोबत दोन खासदार असल्याने त्यांचं जास्त काही नुकसान होणार नाही, पण शिंदे गटाचं काय असा प्रश्न विचारला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकरेंना सोडून आलेल्या 13 खासदार असून त्यांच्यातील काही जणांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही असं बोललं जातंय.

दिल्लीत भाजपची जागावाटपावर चर्चा

राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये फक्त भाजप नेत्यांचा समावेश आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला किमान 13 जागा तरी मिळाव्यात अशी मागणी त्यांच्याकडे केल्याचं समजतंय. 

शिंदे- अजित पवारांना सिंगल डिजिट

महायुतीतील महत्त्वाचे पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला भाजपकडून 10 च्या आत जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये अजित पवारांचे जास्त काही नुकसान होताना दिसत नाही. पण एकनाथ शिंदेंचं मात्र नुकसान होण्याची चिन्हं आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 13 खासदार आहेत. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 18 जागा मिळाव्यात अशी मागणी करणाऱ्या शिंदेंनी शेवटी आपल्याला किमान 13 जागा तरी देण्यात याव्यात अशी भाजपकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने जर त्यांना दहापेक्षा कमी जागा दिल्या तर शिंदेंसोबत आलेले खासदार काय करणार हे पाहावं लागेल. कारण यामध्ये शिंदे गटाच्या चार ते पाच खासदारांना आपलं तिकीट गमवावं लागणार असल्याचं दिसतंय.

एकनाथ शिंदेंसोबत आलेले खासदार (Shiv Sena Eknath Shinde MP List)

1. श्रीकांत शिंदे – कल्याण
2. राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई
3. हेमंत पाटील – हिंगोली
4. प्रतापराव जाधव – बुलडाणा
5. कृपाल तुमाणे – रामटेक
6. भावना गवळी – यवतमाळ-वाशिम
7. श्रीरंग बारणे – मावळ
8. संजय मंडलिक – कोल्हापूर
9. धैर्यशील माने – हातकणंगले
10. सदाशिव लोखंडे – शिर्डी
11. हेमंत गोडसे – नाशिक
12. राजेंद्र गावित – पालघर
13. गजानन कीर्तीकर – वायव्य मुंबई

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts