India Playing 11 For 5th Test Dharamsala Test Rohit Sharma Jasprit Bumrah Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Playing 11 for 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी  (IND vs ENG) आजपासून सुरुवात होणार आहे. धर्मशालाच्या मैदानात भारत आणि इंग्लंडचे संघ भिडणार आहेत. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे.  लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरणार आहे. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडचं अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरलं. भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. आता टीम इंडिया विजयी चौकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल निश्चित मानला जातोय. कारण, चौथ्या कसोटीत आराम करणारा जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतलाय. 

रोहित शर्मा दोन बदल करणार ?

भारतीय संघात दोन बदलाची शक्यता वर्तवण्यात येतेय. आकाशदीपच्या जागेवर जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रजत पाटीदार याला बेंचवर बसवलं जाऊ शकतं. रजत पाटीदारऐवजी देवदत्त पड्डीकल याला संधी दिली जाऊ शकते. रजत पाटीदार याला आतापर्यंत लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. केएल राहुलच्या अनुपस्थितीत पाटीदार याला संधी दिली. पण तिन्ही सामन्यात तो मोठी खेळी करु शकला नाही. सहा डावात त्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात पाटीदारऐवजी पड्डिकल याला संधी दिली जाऊ शकते. त्याशिवाय कुलदीप यादव यालाही आराम दिला जाऊ शकतो. त्याच्याजागी अक्षर पटेल याला स्थान दिलं जाऊ शकते. 

भारताची संभाव्य 11 – 

यशस्वी जायस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पड्डीकल, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

इंग्लंडच्या संघात मार्क वूड परतला – 

इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात फक्त एका वेगवान गोलंदाजासह उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन सामन्यानंतर इंग्लंडने रणनिती बदलली. आता इंग्लंड संघ दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरत आहे. धर्मशाला कसोटी सामन्यात मार्क वूड आणि जेम्स अँडरसन वेगवान गोलंदाजीची धूरा संभाळणार आहे. शोएब बशीर आणि टॉम हार्टले फिरकीची धुरा संभाळतील. त्यांच्या जोडीला जो रुट असेलच.

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर

 

[ad_2]

Related posts