Now it’s time for us to do something for Sharad Pawar Saheb Yugendra Pawar urges to NCP workers in Baramati Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती: जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन पक्ष झाले पुन्हा पक्ष बांधणीला सुरुवात केली त्यावेळेस इथे कोणीही पुढे येत नव्हतं. मात्र, आता कार्यकर्त्यांची गर्दी बघून मला चिंता वाटत नाही. कमी वेळात आपल्या पक्षाबरोबर जास्त कार्यकर्ते जोडले गेले. आपल्यावर अशी परिस्थिती आली होती की, कार्यकर्त्यांच्या मागे लागावे लागत होते, की आमच्या पक्षात या तुम्हाला हे पद देतो ते पद देतो. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षात येऊ लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) हे बारामतीसाठी दैवत आहेत त्यांनी आपल्या बारामतीच्या  विकासासाठी खूप काही केले आहे. आता वेळ आली आहे आपणही साहेबांसाठी काहीतरी करून दाखवण्याची. बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) बोलत होते.

आज सकाळीच लोणावळ्यातील अजितदादा गटात गेलेल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश केला. बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का? मुळात दादा जनतेचा नव्हे तर स्वत:चा विकास करायला गेले आहेत. मात्र, आम्हाला संविधान वाचवायचे आहे, अशी भावना या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

लोकसभेची पूर्वतयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले सुरुवात झाली असेल सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केल्यानंतर अजून तरी या मतदारसंघातील महाविकास आघाडी चे चित्र स्पष्ट झाले नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रभारी व संभाव्य उमेदवार सुरेश बाळ्या  मामा म्हात्रे यांनी विधानसभा निहाय कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सायंकाळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा भादवड या ठिकाणी आयोजित केला होता. या मेळाव्यास सुरेश म्हात्रे व पक्षाचे प्रदेश प्रवक्ता महेश तपासे यांनी मार्गदर्शन केले.

बारामती येथे आयोजित रोजगार मेळाव्यात शरद पवार हे व्यासपीठावर येतात सभेसाठी उपस्थित हजारो बारामतीकरांनी शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत केले. यावरुन कार्यकर्त्यांचे त्यांच्यावरील प्रेम दिसून येते. अजित पवार यांच्या सभेत शरद पवार यांचा एका चाहत्याने घोषणाबाजी केल्यानंतर त्यास मारहाण केली त्याला त्या ठिकाणाहून हाकलून दिले .परंतु त्याच्या मनातील शरद पवार ते काढू शकले नाहीत.भविष्यात एखाद्या सभेमध्ये 100% शरद पवार यांच्या विचारांचे चाहते सभेमध्ये दाखल झाले तर तेव्हा काय होणार, याचा विचार करा अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेश प्रवक्ता महेश तपासे यांनी दिली आहे .

तर शरद पवार यांचे ओझे महाराष्ट्र पन्नास वर्ष उचलत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना महेश तपासे यांनी सांगितले की,  शरद पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय इतर पक्षांचे राजकारण होऊ शकत नाही. बातमी बनू शकत नाही, हे भाजपाला माहिती असल्याने शरद पवारांवर टीका केली आहे. वास्तविक अमित शहा यांनी शरद पवार यांचे उपकार मानायला हवेत.जेव्हा गुजरात मध्ये महाभूकंप झाला त्यावेळेस राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असताना प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी ती परिस्थिती हाताळण्याचे काम शरद पवार यांच्यावर सोपवले होते, हे अमित शहा विसरले आहेत, असे महेश तपासे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही; पवारांचा सुनील शेळकेंना इशारा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts