Why Sharad Pawar gets angry on Sunil Shelke MLA Shahajibapu Patil explain reason in loksabha election rally at Pandharpur

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पंढरपूर: शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाने बोलताना दिसत आहेत. त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचा हा परिपाक असावा, असे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी म्हटले. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांच्या विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमानंतर शहाजीबापू बोलत होते . आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोणावळा येथे बोलताना आमदार सुनील शेळके यांच्यावर ज्या भाषेत संताप व्यक्त केला त्याबाबत छेडले असता शहाजीबापू बोलत होते . अजितदादांच्या भूमिकेमुळे जरी साहेब रागावले असले तरी अजितदादा यांचीच भूमिका बरोबर आहे, अशी पुस्ती शहाजीबापू यांनी जोडली . 

आज देशाचा विकास आणि राजकारण ज्या दिशेने चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आज जगातले १२५ देश मानतात. अशा परिस्थितीत देशात सुरु असलेले विकासाचे पर्व आणि आंतराराष्ट्रीय राजकारणात मिळविलेला दबदबा पाहून पवार साहेबांनी वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती, असे मतही शहाजीबापू यांनी व्यक्त केले . महायुतीही मोठी असून घटकपक्षातील अनेक नेते विविध जागांसाठी आग्रही आहेत. यामुळे जागावाटपाचे काम सुरु आहे. योग्यवेळी करेक्ट उमेदवारांची यादी समोर येईल, असे शहाजीबापू यांनी म्हटले.

माढा लोकसभेत सध्या  प्रत्येकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळी भाषा वापरत आहे. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व वातावरण निवळलेले असेल. माढा लोकसभेसाठी रामराजे यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी मागत आहेत . पण ज्यावेळी उमेदवाराची घोषणा होईल त्यावेळी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिलेल्या उमेदवाराला निवडून आणतील, असा विश्वासही शहाजीबापू यांनी व्यक्त केला . 

भाऊबंदकी कोणाला चुकलेय, पक्षशिस्त पाळणार नाहीत, त्यांना अजित पवार वठणीवर आणतील: रणजितसिंह नाईक निंबाळकर

भाऊबंदकी गावोगावी असते, ती माझ्याही नशिबात आहे, मात्र, जे निवडणुकीत शिस्तीने काम करणार नाहीत, त्यांना वठणीवर आणायला अजितदादा खंबीर आहेत, अशा शब्दामत आज खासदार रणजित निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांना खणखणीत प्रत्युत्तर दिले . एका बाजूला रामराजे निंबाळकर आणि दुसऱ्या बाजूने धैर्यशील मोहिते पाटील असा दुहेरी विरोधामुळे रणजित निंबाळकर अडचणीत आल्याच्या चर्चा होत्या . आज उपरी येथे रात्री विकास कामांच्या उदघाटनाला आले असता निंबाळकर यांनी सर्व विषयावर मनमोकळी उत्तरे दिली . 
     
भाऊबंदकी सगळीकडे असली तरी त्यांचा आणि माझा पक्ष वेगळा आहे . मात्र, त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा हे भाजपच्या हातात हात घालून काम करीत आहेत . ते जे बोलतात तेच करतात , आत एक आणि बाहेर एक असा अजितदादा यांचा स्वभाव नसल्याने त्यांचेवर माझा १०० टक्के विश्वास आहे, असे खासदार रणजित निंबाळकर सांगत रामराजे यांचा विषय संपवला. 

माढा लोकसभा मतदारसंघातील जयकुमार गोरे , शहाजीबापू पाटील , बबनदादा शिंदे , संजयमामा शिंदे या चार आमदारांनी मला उघड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले . मोहिते पाटील आणि माझ्यात कोणतेही वाद नसून उमेदवारी मागणे हा त्यांचा हक्क आहे, असे सांगत माढा लोकसभा मतदारसंघात कमळ हाच उमेदवार आहे . उमेदवारी मला मिळो , मोहिते पाटील यांना मिळो अथवा तिसऱ्याला मिळो, निवडून कमळ येणार आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्हा सर्वांना काम करावे लागणार आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले . माझ्या उमेदवारीमुळे फलटणमधील राजकारणात निंबाळकर यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, याची जाणीव असल्याने ते मला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचे खा रणजित निंबाळकर यांनी सांगितले . असे असले तरी विरोध करणाऱ्यांविरोधात ९० टक्के मते मला मिळतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला . यावेळी मी पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली नसून पक्ष जो आदेश देईल तो पाळायचा एवढेच ठरवले असून माढा लोकसभा मतदारसंघातून कमळ विक्रमी मताने विजयी जाईल, असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

आणखी वाचा

मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही; पवारांचा सुनील शेळकेंना इशारा

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts