Sarfaraz Khan Half Century Against England For Team India 5th Test Dharamshala

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sarfaraz Khan India vs England : धर्मशाला येथे सुरु असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात सरफराज खान यानं शानदार अर्धशतक ठोकलेय. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या शतकी खेळीनंतर सरफराज खान यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची मनसोक्त पिटाई केली. धर्मशाला कसोटीच्या पहिल्या डावात भारताने 350 धावांचा पल्ला पार केलाय. भारतीय संघाकडे सध्या 160 धावांच्या आघाडीवर आहे. धर्मशाला कसोटीवर भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं. गोलंदाजांनी आधी इंग्लंडच्या बॅझबॉलला रोखलं. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी अतिआक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुराळा उडवला. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकं ठोकली. यशस्वी जायस्वाल यानं पहिल्या दिवशी अर्धशतक ठोकलं होतं. दिग्गज माघारी परतल्यानंतर सरफराज खान यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सरफरजा खान यानं शानदार अर्धशतक ठोकलेय. 

सरफराज खान यांनं 60 चेंडूमध्ये 56 धावा चोपल्या. यामध्ये त्यानं एक षटकार आणि आठ चौकारांचा पाऊस पाडला. इंग्लंडविरोधात सरफराज खान यानं तिसरं अर्धशतक ठोकलं. इंग्लंडविरोधातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत सरफराज खान यानं पदार्पण केले होते. सरफराज खान यानं देवदत्त पडिक्कल  याच्यासोबत शतकी भागिदारी केली. सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल  यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 400 धावांकडे मजल मारली आहे. 

सरफराज खान पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो. दुसऱ्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा सरफराज खान 56 धावांवर बाद झाला. त्यानं या डावात आठ चौकार ठोकले होते. सरफराज खान याला दुसऱ्या बाजूला देवदत्त पडिक्कल  शानदार साथ देतोय. देवदत्त पडिक्कल सध्या 60 धावांवर खेळतोय. दोघांमध्ये शतकी भागिदारी झाली. 

अनोखा विक्रम – 

भारतीय कसोटी इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद झाली. धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय टॉप फलंदाजांनी पाच भागिदाऱ्या केल्या. आघाडीच्या फलंदाजांनी पाच भागिदाऱ्या करण्याची मागील 15 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 



[ad_2]

Related posts