Team India Will Change In Tests Rohit Sharma Virat Kohli Pujara Rahane ; BCCI कसोटी संघात करणार मोठा बदल, टीम इंडियातील बिग-४चा गेम ओव्हर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला आणि लगेचच बीसीसीआयने टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. यासह टीम इंडियाचा नव्या WTCच्या हंगामाला सुरुवात होईल. भारताचा वेस्ट इंडिज दौरा १२ जुलै ते १३ ऑगस्ट या काळात होणार आहे. यात २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० मॅच होणार आहेत.रिपोर्ट्सनुसार या दौऱ्यातील टी-२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे खेळाडू खेळण्याची शक्यता नाही. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताच्या कसोटी संघात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BCCIकडून नव्या शोध सुरू; रोहित शर्मानंतर कोण होणार कसोटीचा कर्णधार, या चौघांचे नाव आघाडीवर
भारतीय संघातील बिग फोर अर्थात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वगळले जाऊ शकते. कमीत कमी यातील दोघांना तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. जर असे झाले तर WTC फायनलमधील ८० टक्के टीम इंडिया बदलेल. भारतात मोठ्या प्रमाणात गुणवंत खेळाडू आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक जण वाट पाहत आहे.

भारताला दंड करून ICCने तिजोरी भरली; टीम इंडियाला झालेल्या एकूण दंडाची रक्कम वाचून बसेल धक्का
वेस्ट इंडिज दौऱ्यात सरफराज खान, यशस्वी जयसवाल, मुकेश कुमार, अभिमन्यू ईश्वरन, जीतेश शर्मा, प्रियांक पांचाल, बाबा इंद्रजीत या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या बरोबर हनुमा विहारीला देखील स्थान मिळू शकते. काही खेळाडू दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहेत, त्यापैकी ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांचा देखील फिटनेसवर विचार केला जाईल.

रोहित, पराभवानंतर असे बोलणे कितपत योग्य; गावसकर संतापले, IPLमध्ये अशी मागणी करता का?
भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिक म्हणाला, संघातील ज्या खेळाडूंचे वय ३० किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांच्या समावेशाबाबत विचार केला जाऊ शकतो. याचा निर्णय कोच राहुल द्रविड यांना घ्यावा लागणार आहे. काही युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. यात यशस्वी, सरफराज आणि मुकेश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. एकूणच WTC फायनलनंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसत आहे.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts