Mira Road Saraswati Murder Case Police Misled By Manoj Who Killed Saraswati Ready To Take Any Punishment

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mira Road Crime: मीरा रोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडात (Saraswati Vaidya Murder Case) आतापर्यंत 20 ते 25 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. आरोपी मनोज साने याने आपल्या प्रकृतीबाबत काही दावे केले होते, त्याबाबत पोलीस त्याची मेडिकल चाचणी करणार होते. मात्र काही कारणास्तव मेडिकल चाचणी करण्यात आली नाही. बुधवारी (14 जून) आरोपी मनोज सानेची मेडिकल चाचणी पोलीस करू शकतात.

प्रकरणाचा तपास सुरूच

मयत सरस्वती वैद्यच्या मृत शरीरावर सोमवारी (12 जून) तिच्या कुटुंबीयांनी मुंबई मधील रे रोड येथे अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली आहे. तर सरस्वतीच्या हत्येचे पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी मनोजला घटनास्थळी नेवून पंचनामा केला आहे. पंचनाम्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून मिरा भाईंदर महानगरपालिकेचे पंच पोलिसांनी घेतले आहेत. प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

मनोज सानेकडून पोलिसांची दिशाभूल

सरस्वतीची हत्या करणारा तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज हा पोलीस तपासात पोलिसांची दिशाभूल करत आहे. पोलीस जे पुरावे त्याच्यासमोर मांडत आहेत, केवळ त्याबद्दलच तो बोलत आहे. सुरुवातीला सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा दावा मनोजने केला होता. परंतु हत्येच्या काही दिवसापूर्वीच मनोज इंटरनेटवर कोणते विष घातक आहे, याची माहिती शोधत असल्याचे त्याच्या मोबाईलमधून समोर आले आहे. याशिवाय सरस्वतीचा मोबाईल फोन देखील तो स्वतः जवळच ठेवत असल्याचे सिद्ध झाले आहे. या काळात तो डेटींग ॲपद्वारे काही महिलांशी चॅट देखील करायचा, तसेच तो मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ देखील बघत असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळेत ती शिक्षा भोगायला मनोज तयार

सरस्वती वैद्यला समाजसेवा करण्याची आवड होती आणि त्यामुळेच तिने अहमदनगर येथे आपल्या अनाथालयात जावून खाऊ वाटप केलं होतं. क्रुरकर्मा मनोज सानेला आपल्या कृत्याबद्दल आता थोडा पश्चाताप होत आहे. आता जी शिक्षा मिळेल ती भोगायला तयार असल्याचं तो बोलत आहे.

दोघांचा विवाह झाल्याचं समोर

आरोपी मनोज साने याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात मयत सरस्वती वैद्यशी विवाह केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. तर, मयत सरस्वतीच्या लहान बहिणीने 1998 मध्ये लग्नाच्या दोन वर्षांनंतर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 

हेही वाचा:

[ad_2]

Related posts