Sharad Pawar Threat Case Sagar Barve Arrested In Mumbai Police CustodyMumbai Police Directly Sought Information From Facebook And Twitter

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी देणारा सागर बर्वे याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या सागर बर्वेला मुंबई गुन्हे शाखेच्या  पथकानं रविवारी अटक केली होती. सागर बर्वे तपासात सहकार्य करत नसल्यानं मुंबई पोलिसांनी थेट फेसबुक आणि ट्विटरकडून माहिती मागवली आहे. 

सागर बर्वेचे तो राहात असलेल्या पुण्यातील कोथरुड भागातील सोसायटीतील रहिवाशांसोबत देखील सतत वाद होत होते. सोसायटीत वादग्रस्त पोस्टर्स लावणं, सोसायटी मेंबर्सच्या वॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणं यामुळे त्याचे शेजाऱ्यांशी सतत खटके उडत होते. दरम्यान मुंबई गुन्हे शाखेने त्याला आज न्यायालयात हजर केलं असता त्याने नर्मदाबाई पटवर्धन या बनावट नावाने अकाऊंट तयार करुन धमकी का दिली? याचा तपास करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. 

पुण्यातील कोथरुड भागातील वात्सल्य पुरम सोसायटीत राहणारा सागर बर्वे हा 34 वर्षांचा तरुण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल सध्या अटकेत आहे. आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या सागर बर्वेने नर्मदाबाई पटवर्धन या बनावट नावाचे फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून शरद पवारांना ‘तुमचा दाभोळकर करु’, अशी धमकी दिल्याच मुबंई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. सागर बर्वे या सोसायटीतील ज्या फ्लॅटमधे राहातो तो सध्या बंद आहे. मात्र या फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आलेली पोस्टर्स सागर बर्वे कसा विचार करतो, हे सांगण्यास पुरेशी आहेत. 

सागर बर्वेने या आधीही सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा दिसून आलं आहे.  एवढंच नाही तर तो ज्या वात्सल्य पुरम सोसायटीत रहातो त्या सोसायटीच्या सदस्यांनीही त्यामुळे त्याच्यापासून चार हात दूर राहणंच पसंत केल होतं. सागर बर्वेच्या या आधीच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहता तो एका विशिष्ट विचारसरणीने भारावून गेल्याचं स्पष्ट दिसत आहे.  मात्र पोलिसांच्या मते त्याचे कोणत्याही संघटनेशी थेट संबंध असल्याच आतापर्यंत समोर आलेलं नाही. तो तपासात सहकार्य करत नसल्याने मुंबई पोलीसांनी फेसबुक आणि ट्विटरशी संपर्क साधून आणखी माहिती मागवली आहे.  त्यातून सागर बर्व एका महिलेचे नाव धारण करून हे उद्योग का करत होता? हे समोर येण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Related posts