Will Rohit Sharma Play For Chennai Super Kings Csk Ambati Rayudu Statement Created Uproar Ipl 2024 News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma, Chennai Super Kings : आयपीएलच्या 17 व्या हंगामला (IPL 2024) अवघ्या दहा दिवस शिल्लक आहेत. 22 मार्चपासून आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. आरसीबी आणि चेन्नई (RCB vs CSK) यांच्यामध्ये सलामीच सामना होणार आहे. त्याआधी चेन्नईचा माजी खेळाडू अंबाती रायडूनं (Ambati Rayudu) केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘आयपीएलच्या पुढील हंगामात रोहित शर्मानं (Rohit Sharma) चेन्नईसाठी खेळावं. एमएस धोनीनं निवृत्त घेतली तर रोहित शर्मा चेन्नईचं कर्णधारपदही संभाळू शकतो, असे चेन्नईच माजी खेळाडू अंबाती रायडू म्हणाला आहे. एका वृत्तवाहिनीसोबत तो बोलत होता. अंबाती रायडूच्य वक्तव्यानं क्रीडा जगतामध्ये चर्चेल उधाण आले आहे. 

आयपीएलच्या 17 व्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सनं मोठा निर्णय घेतला. मुंबईने पाच वेळा चषक उंचावून देणाऱ्या रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकलपट्टी केली. त्यानंतर हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्यानंतर रोहित शर्माबद्दल चर्चेला उधाण आले. रोहित शर्मबद्दल अंबाती रायडू यानं केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. रोहित शर्मानं चेन्नईचं कर्णधारपद संभाळावं, असे रायडू म्हणालाय. 

रोहित शर्मा आणखी पाच वर्ष खेळू शकतो – 
 
आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईकडून अंबाती रायडू खेळला आहे. “अंबाती रायडू म्हणाला की, येणाऱ्या काळात रोहित शर्मा चेन्नईकडून खेळतान दिसू शकतो.” रोहित शर्मा चेन्नईचा कर्णधारही असू शकतो, असेही रायडू म्हणला. एका मुलाखतीत बोलताना रायडू म्हणाला की, “रोहित शर्माला मला चेन्नईकडून खेळताना पाहायचं आहे. धोनीनं जर निवृत्ती घेतली तर रोहित शर्मा संघाची धुरा संभाळू शकतो. जर रोहित शर्मा चेन्नईकडून खेळला तर चांगलं होईल. पुढील पाच ते सहा वर्ष रोहित शर्मा आयपीएल खेळू शकतो.”

चेन्नईचा कर्णधार होऊ शकतो – 

रोहित शर्मा पुढील पाच ते सहा वर्ष आयपीएलमध्ये आरामात खेळू शकतो. जर त्याला कर्णधारपद हवं असेल तर त्याला अनेक पर्याया उपलब्ध आहेत. त्याला हवं तिथं कर्णधारपद मिळू शकते. मला रोहित शर्माला चेन्नईकडून खेळतान पाहायचं आहे. जर धोनीनं निवृत्ती घेतली तर पुढील वर्षी रोहित शर्म चेन्नईचा कर्णधारही होऊ शकतो, असे अंबाती रायडू म्हणाला.
 



[ad_2]

Related posts